अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच भाजपाच्या मदतीमुळे लटके यांचा विजय झाला असून ही निवडणूक आम्ही लढवली असती, तर त्यांचा पराभव निश्चित होता, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.

हेही वाचा – “…तेव्हा झोपले होते का?” ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर ठाकरे गटाच्या नेत्याचं राज ठाकरेंवर टीकास्र!

गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होती. दरम्यान, आज या निवडणुकीचा निकार जाहीर झाला आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांना ६० हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली असून दुसऱ्या क्रमांकाची मत ‘नोटा’ला मिळाली आहे. या विजयानंतर ”नोटाला गेलेली मतं ही भाजपाची होती” असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत असताना आशिष शेलार यांनी ट्वीट करत ठाकरे गटावर टीका केली आहे.

हेही वाचा – Andheri By Poll: ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मशाल भडकली आणि…”

“भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्वमध्ये विजय आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप यासारख्या डझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही ठाकरे गटाला जास्त मतं मिळाली नाही. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता”, असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या निवडणुकीत ऋतुजा लटकेंना एकूण ६६ हजार २४७ मतं मिळली असून नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आहेत. तर १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले.