नाशिक विधानपरिषदेची जागा काँग्रेसची होती. काँग्रेसच्या चिन्हावर दोनवेळा सुधीर तांबे दोनवेळा निवडून आले होते. विधानपरिषदेचे गटनेते होते. त्यामुळे काँग्रेसने दिलेली उमेदवारी सुधीर तांबेंनी नाकारणं हे उचित झालं नाही. सत्यजीत तांबेंना उमेदवारी देण्यास कोणाचाही विरोधी नव्हता. पण, सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची माहिती नाही, असं मत माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, “नाशिकची जागा पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडून आली असती. मात्र, सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याने काँग्रेसचं काही प्रमाणत नुकसान झालं आहे. तसेच, सत्यजीत तांबेंनी अपक्ष राहणार म्हणून भूमिका जाहीर केली आहे.”

हेही वाचा : “महाविकास आघाडीचे आव्हान क्षुल्लक”, चिंचवड पोटनिवडणुकीवर अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “लोक म्हणतात..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नाना पटोले एकदम भडकतात अन्…”

“मी बाळासाहेब थोरातांचं कौतुक करतो. त्यांच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. तेव्हा त्यांना म्हणालो, बाळासाहेब तुम्ही काम करता त्याचंही कौतुक करता आणि जो करत नाही त्याचंही कौतुक करता. तुमच्या जीभेवर साखर आहे. ही बाळासाहेब थोरात यांची खासियत आहे. नाना पटोलेंचं तसेच आहे. नाना पटोले एकदम भडकतात. नंतर म्हणतात चूक झाली, जाऊदे. पण, माझं मत आहे की, दोघेही आपल्या परीने काम करतात,” असं अशोक चव्हाणांनी सांगितलं.