scorecardresearch

Premium

मराठा आरक्षणाबाबत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं मोठं विधान; म्हणाले…

मराठा आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी याबद्दल मोठं विधान केलं आहे.

dhirendra krushna shastri on maratha reservation
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणास बसले होते. पण, सरकारच्या विनंतीनंतर जरांगे-पाटलांनी दोन महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं आहे. आता मराठा आरक्षणावर बागेश्वर धामचे अध्यात्मिक गुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी भाष्य केलं आहे.

“मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे,” असं म्हणत धीरेंद्र शास्त्रींनी पाठिंबा दर्शवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान दरबार भरणार आहे. रविवारी ( ६ नोव्हेंबर ) धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Fadnavis Jarange Shinde
“मराठा आणि कुणबी एकच आहेत, याचे पुरावे…”, मनोज जरांगेंचं मोठं विधान, म्हणाले, “आता…”
maharashtra government over obc issue
मराठा आरक्षण आणि ओबीसी प्रश्नावरून सरकार कात्रीत
Sanjay Raut Shinde Fadnavis
“…म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळायचं आहे”, संजय राऊतांचा आरोप
sambhajiraje chhatrapati
“मी ज्या दिवशी सरकारमध्ये येईन…”, मराठा आरक्षणासाठीच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संभाजीराजेंचं वक्तव्य

हेही वाचा : मराठा आरक्षण न्यायालयात का टिकले नाही? जाणून घ्या…

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कारण, जेव्हा देश गुलामगीरीत होता, तेव्हा शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम मराठा समाजानं केलं. सरकारनं मराठा समाजाशी चर्चा करून आरक्षण दिलं पाहिजे. बागेश्वर पीठ मराठा समाजाबरोबर आहे.”

हेही वाचा : मराठा आरक्षण मिळणार कसे?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अयोध्यानगरी येथे ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान कार्यक्रम पार पडणार आहे. तीनदिवसीय कार्यक्रमासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्यानगरीच्या ५६ एकर मैदानावर सुमावरे ४० एकरांवर रामकथेसाठी मंडप टाकण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bagheshwar dham bageshwar baba dhirendra krishna shastri on maratha reservation chhatrapati sambhajinagar ssa

First published on: 07-11-2023 at 09:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×