राज्यात महाविकासआघाडी कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा पोटनिवडूक होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी काँग्रेस अंधेरी पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारला. यावर बाळासाहेब थोरात यांनी याबाबत आमचे पक्षश्रेष्ठी एकत्र बसून निर्णय घेतील, असं मत व्यक्त केलं.ते मंगळवारी (४ ऑक्टोबर) बुलडाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “अंधेरीच्या निवडणुकीत काँग्रेस म्हणून आम्ही एकत्रितच राहू. आमचे पक्षश्रेष्ठी एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. हा निर्णय होईल तेव्हा आम्ही तो जाहीर करू.”

“हे सरकार कस बनलंय हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वोच्च न्यायाल्याच्या निकालावर अवलंबून आहे की हे सरकार किती दिवस टिकेल,” असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारलाही टोला लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार

‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यानिमित्ताने आज (४ ऑक्टोबर) शेगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये बाळासाहेब थोरात म्हणाले, “भारत जोडो यात्रा सभेचे आयोजन शेगाव येथे करण्याचा आमचा आग्रह आहे. मात्र त्यांच्या टीमने जर मान्य केले तर शेगाव येथेच राहुल गांधी यांची सभा होईल.”