राज्यात एकीकडे ओबीसी आरक्षण व त्यातून मागणी केलं जाणारं मराठा आरक्षण हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्यापाठोपाठ दुसरीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्यावर भंडारा टाकण्याचा प्रकार समोर आला असून यावरून आता धनगर आरक्षणाचा मुद्दा नव्याने पेटण्याची शक्यता आहे.

नेमकं घडलं काय?

राज्याचे महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात थांबले असताना आज सकाळी त्यांना भेटण्यासाठी धनगर कृती समितीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आल्याची माहिती त्यांना कार्यकर्त्यांनी दिली. त्यांनी संबंधित शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..

यावेळी बंगाळे नामक धनगर आरक्षण कृती समितीचा पदाधिकारी एक निवेदन घेऊन तिथे दाखल झाला. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्याने निवेदनही दिलं. मात्र, विखे पाटील हे निवेदन वाचत असताना त्यानं खिशातून एक पुडी काढून त्यातला भंडारा विखे पाटलांच्या डोक्यावर ओतला.

भंडारा टाकणाऱ्याला सुरक्षारक्षक व कार्यकर्त्यांनी चोप दिला!

झाला प्रकार सर्वांसाठीच अनपेक्षित असल्यामुळे काय घडलंय हे समजण्यासाठी मध्ये दोन क्षण गेले आणि विखे पाटलांच्या अंगरक्षकांनी बंगाळेची लगेच धरपकड करून त्याला चोप दिला. त्यात विखे पाटलांचे काही कार्यकर्तेही असल्याचं सांगितलं जातं. यानंतर पोलिसांनी बंगाळेला ताब्यात घेतलं असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

बंगाळेनं असं का केलं?

दरम्यान, बंगाळेनं यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत करावी व ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लावू नये यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया बंगाळेनं दिली.

“ओबीसीतून मराठा आरक्षण देणं अशक्य”, पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “अशी कुठली मागणी नव्हतीच!”

“…तर मुख्यमंत्र्यांनाही काळं फासायला कमी करणार नाही”

“मी प्रसारमाध्यमातून आवाहन करतो की धनगर आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही, तर येणाऱ्या काळात मुख्यमंत्री, मंत्र्यांना काळं फासायलाही धनगर समाज मागे-पुढे बघणार नाही”, असा इशाराच बंगाळेनं दिला आहे.

यापूर्वी २०१४ च्या सरकारमध्ये विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना त्यांच्यावरही बंगाळेनं अशाच प्रकारे भंडारा उधळल्याचं सांगितलं जातं.