scorecardresearch

आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर कथित बॉयफ्रेंडची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

या दोघांनी अनेक भोजपुरी म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केलं आहे

aankasha dubey
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं. तिच्या आत्महत्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर तिच्या कथित बॉयफ्रेंडने पोस्ट शेअर करत श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

आकांक्षाचा कथित बॉयफ्रेंड समर सिंह हा भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व गायक आहे. ‘निशब्द आकांशा दुबेच्या आत्म्यास शांती लाभो’ अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.. गेल्या महिन्यात, आकांक्षा दुबेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर समर सिंहबरोबरचा फोटो शेअर केला होता. या जोडीने अनेक भोजपुरी म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नात्याबद्दल खुलासा केला होता अशी चर्चा आहे.

आकांक्षा दुबेने गळफास घेण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केलेली पोस्ट, निधनानंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

आकांक्षा मूळची मध्य प्रदेशातील मिर्जापूची रहिवाशी आहे. २१ ऑक्टोबर १९९७ साली तिचा जन्म झाला. तीन वर्षांची असताना ती स्वप्ननगरी मुंबईत आली होती. इन्स्टाग्राम व टिकटॉकवर रील बनवून आकांक्षा प्रसिद्धीझोतात आली. लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड असणाऱ्या आकांक्षाला आयपीएस ऑफिसर बनवण्याचं स्वप्न तिच्या वडिलांनी पाहिलं होतं. परंतु, आकांक्षाला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं.

भोजपुरी मनोरंजनसृष्टीत काम करणं सोपं नसल्याचं आकांक्षाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. काम मिळत नसल्याने आकांक्षा २०१८ मध्ये नैराश्यात गेली होती. तिने मनोरंजनविश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आईच्या सांगण्यावरुन तिने पुन्हा भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 16:38 IST

संबंधित बातम्या