गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली होती. या भेटीवरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. यावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मुंबई तक’शी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, “संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य दुरुस्त करतील. थोडीफार शंका असेल, तरच ते बोलत असतात, हीच महाविकास आघाडीची खासियत आहे. महाविकास आघाडीत उघड चर्चा होत असते. भाजपासारखं जवळ घेऊन एखाद्या पक्षाला संपवत नाही.”

हेही वाचा : “एक लाख रुपयांचं बक्षीस देतो, नारायण राणेंनी…”, विनायक राऊत यांचं आव्हान

“मागील बाजूने पक्ष संपवणे ही भाजपाची प्रवृत्ती आहे, महाविकास आघाडीची नाही. आमच्यातील लोकनेते अजित पवार भाजपाबरोबर गेले आहेत. भाजपाबरोबर गेलेल्या लोकनेत्याला संपवलं जातं. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या लोकनेत्यांना भाजपाने संपवण्याचं काम केलं.”

हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर…”, बच्चू कडू यांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यामुळे भाजपाबरोबर गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही. कुटुंबातील एक व्यक्ती भाजपाबरोबर गेल्याने भीती आणि वाईटही वाटतं. शेवटी संघर्ष करण्याची भूमिका सर्वांनी घेतली आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.