scorecardresearch

Premium

“एक लाख रुपयांचं बक्षीस देतो, नारायण राणेंनी…”, विनायक राऊत यांचं आव्हान

“पंतप्रधान मोदी स्वत:ला विश्वगुरू समजतात, पण…”, असेही विनायक राऊत यांनी म्हटलं.

narayan rane vinayak raut
विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना आव्हान दिलं आहे.

अलीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंत सावंत आमने-सामने आले होते. यावरून आता खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला विश्वगुरू समजतात. पण, गल्लीतल्या कारट्याला मंत्री म्हणून बसवलं आहे, असं टीकास्र विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सोडलं आहे.

विनायक राऊत म्हणाले, “मला पंतप्रधान मोदी यांचं वाईट वाटतं. पंतप्रधान मोदी स्वत:ला विश्वगुरू समजतात. पण, गल्लीतल्या कारट्याला मंत्री म्हणून बसवलं आहे. संसदेत महाराष्ट्राची इज्जत गेली आहे. लोकसभेत महाराष्ट्राचा आवाज आहे. आम्ही पाच जण, पाच पांडवांप्रमाणे आपलं अस्तित्व दाखवून देतो.”

Eknath shinde on Uddhav Thackeray
‘मोदींशी बंद दाराआड चर्चा अन् उद्धव ठाकरेंना घाम फुटला’, एकनाथ शिंदेंनी सांगितला तो प्रसंग
anand paranjape marathi news, anand paranjape jitendra awhad marathi news
“चिंगारी भडकी है तो… ये आग कळवा-मुंब्रा तक भी जाएगी”, आनंद परांजपे यांचा जितेंद्र आव्हाड यांना इशारा
Shambhuraj desai on Ganpai Gaikwad Firing Case
“एकनाथ शिंदेंकडून कोट्यवधी रुपये येणे बाकी”, गणपत गायकवाडांच्या आरोपांवर शंभूराज देसाई म्हणाले, “दीड वर्षांत…”
What Jairam Ramesh Said?
“लालकृष्ण आडवाणींनी २००२ मध्ये मोदींची खुर्ची…..”, भारतरत्न जाहीर झाल्यावर जयराम रमेश यांचा टोला

हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर…”, बच्चू कडू यांचं मोठं विधान

“त्याच संसदेत महाराष्ट्र आणि मुळात कोकणातील एक मंत्री आहेत. त्यांना साधा अविश्वास शब्द उच्चारता येत नाही. हिंमत असेल, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस हा शब्द उच्चारून दाखवावा. एक लाख रुपयांचं बक्षीस देतो,” असं आव्हान विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिलं आहे.

हेही वाचा : VIDEO : “दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची CM च्या खुर्चीवर नजर, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान

“देवेंद्र फडणवीसांना एकदा म्हणालो, तुमच्या नावाचा उच्चार न करता येणाऱ्यांना तुम्ही पक्षात घेतलं आहे. तुमच्या पक्षाची फड, फड कशी होणार? त्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांचा आणि नेत्यांचा आम्हाला अभिमान आहे,” असं विनायक राऊत यांनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narayan rane talk devendra fadnavis word vinayak raut challenge ssa

First published on: 17-08-2023 at 23:35 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×