आषाढी एकादशीनिमित्त वारी व्हावी म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते. मात्र हे ‘सोनिया’ सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचे घेतात आणि काम मात्र औरंगजेबाचे करतात अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बारा बलुतेदारांचे श्रद्धास्थान म्हणून पंढरीचा विठ्ठल आहे. आषाढी एकादशीला निघणारी पायी वारी हा प्रत्येक वारकऱ्यासाठी अविस्मरणीय क्षण असतो. वारीला हजारो वर्षाची परंपरा आहे. वारकरी करोनाचे सर्व नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी तयार असतानादेखील ठाकरे सरकार कोणाच्या दबावाखाली या शेकडो वर्ष चालत आलेल्या हिंदू परंपरेत ख्वाडा घालत आहे?,” असा प्रश्न पडळकरांनी यांनी उपस्थित केला.

“एकीकडे दारु विक्रेत्यांना परवनागी दिली जात असताना पंढरीच्या वारीला मात्र परवनागी देत नाही. महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. केवळ बैठका घेत वारकऱ्यांना झुलवत आहे,” असा आरोप यावेळी त्यांनी केला. “हिंदूंचे सण किंवा महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी असले की यांना करोना दिसतो आणि राजकीय सभा असल्या की करोना दिसत नाही. महाविकास आघाडीने वारीला परवनागी दिली नाही तर ३ जुलैला आळंदी ते पंढरपूर स्वत: वारकरी म्हणून पायीवारी करणार आहे आणि त्यात अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघणार,” असा इशारा पडळकरांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp gopichand padalkar on maharashtra cm uddhav thackeray pandharpur wari congress sgy
First published on: 19-06-2021 at 15:28 IST