“असं म्हटलं जात कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणात शिवसेने शिवाय कुणी दुसरं येत नाही. पण या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला हा समज कोकणाने थोटा ठरवला व भाजपाला भरभरून मतदान दिलं.” असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.
यावेळी उपाध्येंनी अधिक माहिती देताना सांगितले की, “सिंधुदुर्गमध्ये ७० पैकी ५५ च्या आसपास ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. देवगडमध्ये २३ पैकी १७ भाजपाने जिंकल्या आहेत. वैभववाडीत १२ पैकी ९ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी तळेगाव ग्रामपंचायत दत्तक घेतली होती, ही ग्रामपंचायत देखील भाजपाने जिंकली आहे. मालवणमधील सहा पैकी पाच ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. कुडाळमधील पाच पैकी चार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.”
https://t.co/qTeGxDDZjO
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 18, 2021
तसेच, “पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशाप्रकारचा समज गेली अनेक वर्षांपासून आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या पाठिशी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालं.” असल्याचंह यावेळी केशव उपाध्ये यांनी सांगितलं.
सहा हजार पेक्षाही अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपा नंबर १ असेल – उपाध्ये
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत व यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपाने मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यासाठी भाजपाकडून पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.