“मजुरांचे ८५ टक्के रेल्वेभाडे केंद्र सरकार भरते, हा भाजपाचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले आहे. कुठल्याही अभ्यासाअभावी सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्‍या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. सचिन सावंत हे खोटे बोलण्याची फँक्टरी आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अँड.आशिष शेलार यांनी त्यांना टोला हाणला. सचिन सावंत हे ‘उपेक्षित’ जरूर आहेत, पण त्यांनी आपल्या प्रवक्तेपदासाठी ‘अपेक्षित’ अभ्यास करूनच बोलावे, असं म्हणत त्यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एक रेल्वे चालविण्यासाठी रेल्वेला सुमारे ३० ते ५० लाख रूपयांचा अंतरानुसार खर्च येतो. या खर्चाचे गणित एसी १, एसी २, एसी ३, स्लीपर या भागांमध्ये विभागले जाते. स्लीपरचे दर हे अनुदानानुसारच असतात. साधारणत: एका तिकिटासाठी येतो तो खर्च आणि आता राज्य सरकारकडून एका तिकिटासाठी आकारण्यात येत असलेला दर यातील प्रमाण हे ८५ टक्के आणि १५ टक्के असेच आहे,” असं शेलार यांनी सांगितलं.

आणखी वाचा- मजुरांचे ८५ टक्के रेल्वे भाडे केंद्र भरते हा भाजपाचा खोटेपणा उघड : सचिन सावंत

“ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा दाखला देण्यात येत आहे, त्यात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हेच सांगितले की, तिकिटाचे दर हे राज्य सरकारकडून घेण्यात येत आहेत. पण, एक रेल्वे चालविण्याचा एकूण खर्च किती, अशा बाबींवर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद होत नाही. कारण, तेथे उपस्थित सर्वांना हा हिशेब माहिती आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुद्धा वारंवार सांगितले आहे की, राज्यांकडून जे शुल्क आकारले जाते, ते एक रेल्वे चालविण्याच्या खर्चाच्या प्रमाणात १५ टक्के आहे. उर्वरित ८५ टक्के खर्च हा रेल्वेच उचलते आहे. शिवाय स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या राज्यात सोडल्यानंतर ती रेल्वे रिकामी परत येते आहे. सचिन सावंत हे ‘उपेक्षित’ जरूर आहेत, पण त्यांनी आपल्या प्रवक्तेपदासाठी ‘अपेक्षित’ अभ्यास करूनच बोलावे,” असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ashish shelar criticize congress leader spokeperson sachin sawant shramik railway jud
First published on: 29-05-2020 at 16:10 IST