राज्यात करोना व्हायरसचा प्रकोप वाढतच असून अनेक राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाल्याचं समोर आलं असतानाच आता भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनाही करोनाची लागण झाली आहे.

आशिष शेलार यांना बुधवारी करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तशी माहिती त्यांनी रात्री उशीरा ट्विटरद्वारे दिली. “माझी कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे” असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

Puneri Pati Puneri Poster on girls demanding government job
“नवरा सरकारी नोकरीवालाच पाहीजे” पुण्यात तरुणानं अशा अपेक्षा करणाऱ्यांना दिलं चोख उत्तर
Uddhav Thackeray
“घरात काम करणाऱ्यांना वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा”; उद्धव ठाकरेंचा पार्थ पवारांच्या सुरक्षेवरुन टोला
Threats from leaders of India Alliance Allegation of Prime Minister Narendra Modi
इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून धमक्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
Prime Minister Narendra Modi
उच्चशिक्षितांना पंतप्रधान मोदींची भुरळ? इकॉनॉमिस्टचा लेख


याशिवाय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दुसऱ्यांदा करोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. आज पुन्हा माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे.

याआधी १ मार्च रोजी पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना करोनाची लागण झाली होती. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास करोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.