पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली होणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून अधिकारी वर्गामध्ये पाहण्यास मिळाली. मात्र अखेर डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली, विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता पुणे शहराच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान, यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“लॉकडाउनमध्ये सीबीआयचे आरोपी असलेल्या वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरचा पास देणारे गृहखात्याचे वादग्रस्त सचिव अमिताभ गुप्ता गदारोळ झाल्यानंतर काही काळ सक्तीच्या रजेवर, नंतर सेवेत रुजू आणि आता पुणे पोलीस आयुक्तपदी. ‘हे शक्य झाले साहेबांच्या धोरणामुळे’. ते साहेब कोण हे जगाला ठाऊक आहे,” असं म्हणत अतुल भातळखरांनी निशाणा साधला. त्यांनी ट्वीटरवरून अमिताभ गुप्ता यांच्या नियुक्तीवरून टीका केली.

आणखी वाचा- मराठा समाजानं आंदोलन करू नये हे सांगण्याचा नैतिक अधिकार सरकारला नाही : नारायण राणे

डॉ. व्यंकटेशम यांचा कार्यकाळ पूर्ण

पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सूत्रे हाती घेतली होती. तेव्हा पासून आजअखेर नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवून, पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढविण्याचे काम त्यांच्या या कार्यकाळात केले गेले आहे. या अनेक उपक्रमाचे पुणेकर नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे. तर आता डॉ. के. व्यंकटेशम यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader atul bhatkhalkar criticize mahavikas aghadi government pune amitabh gupta commissioner jud
First published on: 18-09-2020 at 13:58 IST