कराड : सोनिया गांधींनी राहुल गांधींचे लग्न केल्यास ते बालिशपणा सोडतील, असा खोचक सल्ला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. राहुल गांधींचे वागणे बालीश असून, त्यांना सभागृहात कसे वागावे हे कळत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपच्या महिला खासदारांनी तक्रार केली असल्याचे वाघ म्हणाल्या.

हेही वाचा >>> साताऱ्यात तणाव निर्माण करणाऱ्यांचा शोध घ्या-शिवेंद्रसिंहराजे; छत्रपतीं’ ची बदनामी खपवून घेणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार भीतीपोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही, अशी खासदार संजय राऊत टीका करत असल्याबाबत छेडले असता  संजय राऊत हे मध्यंतरी १०३ दिवस तुरुंगात होते. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. म्हणून आम्ही त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही अशी खिल्ली वाघ यांनी उडवली. भाजपच्या काळात महिला जास्त असुरक्षित असल्याची टीका काँग्रेसचे नेत्यांकडून होत असल्याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, हा राजकारणाचा विषय नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून महिला सक्षमीकरणासाठी जेवढे प्रयत्न झाले नाहीत. तेवढे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांमध्ये केले आहेत. महिलांवर अत्याचार करणे ही एक विकृती असून, ती मोडीत काढण्याची ताकद त्या-त्या सरकारमध्ये असायला हवी. म्हणून मणिपूरच्या घटनेनंतर नरेंद्र मोदींनी सगळ्या राज्यांना महिलांच्या सुरक्षिततेचे कायदे अधिक सक्षम करावेत, अशा सूचना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास संबंधित आरोपीला मृत्युदंड देण्याबाबतचा कायदा लवकरच अस्तित्वात येईल, असे त्यांनी सांगितले.