Birth certificates issued to bangladeshis in latur : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या शुक्रवारी बांगलादेशी घुसघोरांबद्दल मोठा दावा केला आहे. मराठवाड्यातील लातूर येथे ३०५६ बांगलादेशींना चुकीच्या पद्धतीने जन्म दाखले (birth certificates) देण्यात आली असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत दरम्यान आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी लोकसभा खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले की, त्यांना जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

किरीट सोमय्या यांचा मोठा दावा

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणा बांगलादेशी नागरिकांनी जन्म दाखले मिळवले असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. “महाराष्ट्रात १.२३ लाखांहून अधिक बांगलादेशींनी बोगस कागदपत्रे सादर करून जन्म दाखले मिळवले आहेत. लातूरमध्ये शेजारील देशातील (बांगलादेश) ३४२१ व्यक्तींनी तहसील कार्यालयात फक्त आधार कार्ड सादर करून जन्म प्रमाणपत्रे मिळवली. त्यापैकी ३०५६ जणांना जन्म दाखले मिळाले,” असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान परभणी जिल्ह्यात देखील असाच प्रकार घडल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. परभणी जिल्ह्यात २ हजार ९०० लोकांनी खोट्या कागदपत्रांआधारे भारतीय नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न केला असून येत्या ४८ तासात संबंधितांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत, असे सोमय्या म्हणाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (दि.२८) पुन्हा एकदा परभणीत येऊन पोलिसांशी संवाद साधला आणि तपासाशी संबंधित आणखी माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांगलादेशींना प्रमाणपत्रे कशी मिळाली?

भारत देशात १९६९ च्या कायद्यानुसार मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करून जन्म व मृत्यूची नोंद करता येत असल्याने ५० वर्षात बहुतांश नागरिकांनी ती प्रमाणपत्रे काढून घेतली. मात्र नोव्हेंबर २०२३ मध्ये संसदेने या कायद्यात केलेल्या बदलामुळे जन्माचे दाखले देण्याचे अधिकारी तहसीलदारांना मिळाले. तेव्हापासून बोगस आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर खोट्या कागदपत्रांआधारे हजारो बांगलादेशींनी अर्ज केले आणि तहसीलदारांनी त्यांना जन्मदाखले दिल्याचे गंभीर प्रकार महाराष्ट्रात समोर आले आहेत असे सोमय्या यांनी परभणी येथे सांगितले.