सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले पुन्हा एकदा आमने-सामने आले असून वाद पेटला आहे. सातारा शहरातील विकासकामांचे उद्घाटन, पाहणी आणि भूमिपूजन करण्यासाठी रविवारी उदयनराजे भोसले यांनी शहरातून स्कूटरवर फेरी केल्यामुळे ते दिवसभर चर्चेत राहिले. कार्यकर्त्याची स्कूटर ताब्यात घेत त्यांनी राजपथासह शहराच्या विविध भागांतील विकासकामांची उद्घाटने व पाहणी केली. यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केल्यानंतर आता उदयनराजेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. प्रतापगडावर देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे साताऱ्याची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा साताऱ्याच्या विकासकामांवर खर्च केला असता तर बरं झालं असतं,” असा टोला शिवेंद्रराजे यांनी लगावला होता.

त्यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, “मला चारचाकी परवडत नाही. मी दुचाकीवरुन फिरेन, चालत फिरेन, रांगत फिरेन, माझे गुडघे दुखतात…हवं तर मी लोळत फिरेन, गडगडत जाईन. कोणाला काय समस्या आहे? त्याबद्दल कोणाला दुख: वाटत असेल तर तुम्हीही तसं करा. लोकशाही आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जनतेला कामं हवी आहेत. ती करायची नाहीत आणि आणि मग टीका करायची. नावं ठेवायला अक्कल लागत नाही. पण कॉमन सेन्स फारशी कॉमन नाही आहे. संबंधित लोकं जी नावं ठेवतात मला त्यांनी हिंमत असेल तर समोरासमोर या ना…तेव्हा पूर्वनियोजित कार्यक्रम होते असं सांगतात. माझा फक्त एकच पूर्वनियोजित कार्यक्रम असतो तो म्हणजे जनतेची सेवा”.