धनंजय मुंडे म्हणाले 'आम्ही आता आम्ही भाऊ-बहीण नाही', पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या "रक्ताचं नातं..." | BJP Pankaja Munde on Dhananjay Munde statement over relation sgy 87 | Loksatta

धनंजय मुंडे म्हणाले ‘आम्ही आता आम्ही भाऊ-बहीण नाही’, पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या “रक्ताचं नातं…”

धनंजय मुंडेंची पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्याची जाहीरपणे कबुली

धनंजय मुंडे म्हणाले ‘आम्ही आता आम्ही भाऊ-बहीण नाही’, पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या “रक्ताचं नातं…”
धनंजय मुंडेंची पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्याची जाहीरपणे कबुली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्याची जाहीरपणे कबुली दिली आहे. धनंजय मुंडे यांनी आमचं नाता आता बहीण भावाचं राहिलेलं नाही असं सांगितल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडेंच्या या विधानावर पंकजा मुंडे यांनीही भाष्य केलं असून, रक्ताचं नातं संपत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आपण राजकारणात कोणालाही वैरी मानत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

“आमचं नाता आता बहीण-भावाचं नाही”

“आमचं नातं आता बहीण-भावाचं राहिलेलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंधं आधी होते, नात्यातून राजकारणात वैर निर्माण झालं. त्यामुळे आपल्या वक्तव्याने, वागण्यामुळे काय परिणाम होतात हे ज्याचं त्याने आत्मपरीक्षण करावं. वारंवार अशी वक्तव्यं करताना, ज्याचं त्याने आकलन करुन त्या पद्दतीने मांडावं,” असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

मुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा? धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”

“रक्ताचं नातं संपत नाही”

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या या विधानावर पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की “गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचं नातं कधी संपत नाही असं सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं असलं तरी मी वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. मी व्यक्तीच्या विचारांशी राजकारणाची तुलना करत असते. राजकारणात मला कोणी वैरी वाटत नाही. जो जनतेच्या हिताचा वैरी, तो माझा वैरी आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-09-2022 at 13:22 IST
Next Story
महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश!