सांगली: लग्नानंतर सासू व पतीचे सुमारे २५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन नवविवाहितेने पलायन केले असल्याची तक्रार विटा पोलीस ठाण्यात पतीने दाखल केली आहे.

भिकवडी खुर्द (ता. खानापूर) येथील श्रीपाद फडतरे (वय २७) याचा काही दिवसापुर्वी गावातीलच स्नेहल (वय २३ ) या तरूणीशी विवाह झाला होता. मात्र, तिचा पहिला विवाह झाला असल्याची माहिती फडतरे यांच्यापासून लपवून ठेवण्यात आली. लग्नानंतर तरूणीने नातेवाईक सौरभ माळवे (वय २५) याच्या मदतीने घरातून पलायन केले.

हेही वाचा… भिडे समर्थकांवरील लाठीमारप्रकरणी पोलिसांची होणार चौकशी – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

सासरच्या घरातून पळून जात असताना तिने सासू व पतीचे २५ तोळे वजनाचे सोन्याचे अलंकारही सोबत नेले आहेत. याबाबत विटा पोलीस ठाण्यात फसवणूक व चोरीची फिर्याद तरूणी व तिच्या नातेवाईक तरूणाविरूध्द दाखल करण्यात आली आहे.