लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर शहरात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पाठ भिंतीला लागून असलेल्या वन वसाहतीत एका वन कर्मचाऱ्याच्या घरात घरफोडी होऊन त्यात १५ लाखांची रोकड आणि आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १६ लाख ६० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

आणखी वाचा-जिल्हा न्यायालयातही ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ची व्यवस्था, राज्य शासनाने दिले एक कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिध्देश्वर कैलास सगरे (वय ३८) हे वन विभागाच्या सोलापूर कार्यालयात लेखापाल म्हणून सेवेत आहेत. ते विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पाठ भिंतीला लागून असलेल्या वन वसाहतीत नक्षत्रवन निवासस्थानी राहतात. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी सगरे कुटुंबीय परगावी गेले होते. २३ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा घरी परतले असता त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एका खोलीतील बंद कपाट फोडून १५ लाख रूपयांची रोकड आणि सोन्याच्या पाटल्या आणि नेकलेस असे आठ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १६ लाख ६० हजार रूपये किंमतींचा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले. आठ तोळे सोन्याचे मूल्य एक लाख ६० हजार रूपये इतके दर्शविण्यात आले आहे.