लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला. हा पराभव स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याचीही विनंती केली होती. परंतु, फडणवीसांची ही विनंती फेटाळण्यात आली. दरम्यान, आता भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्याकडून डावपेच रचले जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसचं, देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्याचाही प्रयत्न केला जातोय, असं त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपाला आणि एकूण केंद्रीय नेतृत्त्वाला देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून आपण निवडणूक जिंकू शकू असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांची वाढती नकारात्मक छबी भाजपाला डॅमेज करू शकते, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे फडणवीसांना बाजूला करणे आणि केंद्रीय नेतृत्त्वाला आणून बसवणे हा सरळ सरळ प्रकार आहे. देवेंद्र फडणवीसांची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा >> “गरज सरो वैद्य मरो”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; म्हणाले, “तुमचे पक्ष वाचवण्यात…”

भाजपाचं चोख प्रत्युत्तर

भाजपात काय चाललंय याकडे लक्ष देण्यापेक्षा महाविकास आघाडीत काय चाललंय याची चिंता केली पाहिजे. लोकसभेचा निकाल लागल्यापासून आपण पाहतोय की, काँग्रेस आणि शरद पवार गट दावे करत आहेत. दोघेही आपण मोठे भाऊ आहेत, असं विधान केलं होतं. उद्धव ठाकरे फोन घेत नाहीत, अशी तक्रार यांनी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत सन्मान कसा मिळेल, याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, असं प्रत्युत्तर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनोद तावडेंविषयी चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

विनोद तावडे हे कर्तुत्वान व्यक्तिमत्व आहे. त्यांना कोणते जबाबदारी द्यायची हे केंद्र शासन ठरवेल. जेथे जातील तेथे ते यश मिळवण्यासाठी बारकावे शोधत असतात. ते आणखी मोठे होतील त्याचा आम्हाला आनंद आहे. भाजपचे जे ठरते; ती गोष्ट शेजारच्या मुंगीलाही कळत नाही , असे सूचक विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते.