बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) खासदार भावना गवळी आणि शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत अकोला रेल्वेस्थानकावर मंगळवारी ( २२ नोव्हेंबर ) रात्री समोरा-समोर उभे ठाकले होते. यावेळी ‘५० खोके, एकदम ओके’, ‘गद्दार-गद्दार,’ अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी भावना गवळींविरोधात केली. यावरून भावना गवळी संतप्त झाल्या आहेत. त्यांनी विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यामुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

“विनायक राऊत आणि नितीन देशमुख रेल्वे स्थानकावर १०० जणांसह उभे होते. मुंबईला जाण्यासाठी गाडी पकडत असताना माझ्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तेव्हा कार्यकर्त्यांना चिथावण्याचे आणि माझ्या अंगावर पाठवण्याचे काम केलं. यामुळे माझा जीवही गेला असता. या सर्वामागे विनायक राऊत आणि नितीन देशमुखांचा हात आहे,” असा आरोप भावना गवळी यांनी केला आहे.

हेही वाचा : प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार? अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

“विनायक राऊत आणि नितीन देशमुखांना सुद्धा आई, बहिण, पत्नी आणि मुली आहेत. तुमच्या पत्नी, मुलीबद्दल कोण असे वक्तव्य करून अंगावर आले असते, तर पाहत बसला असता का? त्यामुळे विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात यावी. तसेच, महिला आयोग, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडेही तक्रार करणार आहे,” असेही भावना गवळी यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…तर मंत्रालयाच्या खिडकीतून अरबी समुद्रात प्रेतं दिसतील”, रविकांत तुपकरांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…म्हणून त्यांच्या पोटा दुखत आहे”

“आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलो. त्यामुळे भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. खरे गद्दार कोण आहे, हे सर्वांना दिसलं आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून बाळासाहेबांचे विचार विकले नाही. आम्ही खरी शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन निघाले आहोत. म्हणून यांच्या पोटात दुखत आहे,” असेही भावना गवळी यांनी सांगितलं.