CBI Raids Sameer Wankhede : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली होती. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयने आता एफआयआरमध्ये मोठा खुलासा केला आहे. एएनआयने या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

“बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी उकळण्याची योजना आखली होती”, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये केला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्सप्रकरणी सीबीआयकडून कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह २९ ठिकाणांवरील मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.

हेही वाचा >> “देशभक्त असल्याची शिक्षा मिळतेय”, आर्यन खानला अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

नेमकं प्रकरण काय?

२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यातच आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच मागण्यात आली होती. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देणार होतो, असं साईल यांनी सांगितलं होतं. त्याची गंभीर दखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रकरणात सीबीआयने छापेमारी केली. तसंच, समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. आर्यन खानला सोडण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडून २५ कोटी उकळण्याचा के. पी. गोसावी यांचा डाव होता, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये नोंदवला आहे. त्यामुळे समीर वानखेडेंसह इतरांच्या अडचणी वाढल्या आहेत.