जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय, असं माझं मत असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली, असं विधान गडकरी यांनी केलं आहे. तत्कालीन भाजपाचे माजी खासदार नाना पटोले व सहकार नेते दादा टिचकुले यांचं नाव न घेता गडकरींनी त्यांना टोला लगावला आहे. ते गोंदियातील महामार्गाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली आहे, असं विधान नितीन गडकरींनी केलं आहे. तत्कालीन भाजपाचे माजी खासदार आणि सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील सहकार नेते दिवंगत दादा टिचकुले यांना त्यांनी टोला लगावला आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, मी जे काम हाती घेतो, ते पूर्णत्वास नेतो.आम्ही ६०० कोटी खर्च करून भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा येथील साखर कारखान्याचा विस्तार करतोय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister nitin gadkari statement on sugar factories nana patole and dada tichkule in gondia rmm
First published on: 29-05-2022 at 20:44 IST