कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप या दोन विद्यमान आमदारांच्या निधनामुळे २६ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुक होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीमधील नेत्याच्या बैठका सुरू झाल्या आहेत.त्याच दरम्यान आज पुण्यात कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला माजी खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, कुणाल टिळक, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,माजी सभागृह नेते गणेश बिडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्या सह शहरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय तपास यंत्रणाकडून गैरवापर होताना दिसत नाही.अशी भूमिका वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की,प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल आभार मानतो. २०१४ पासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तेव्हापासून आजअखेर देशातील कोणत्याही राज्यात विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली नाही.तसेच काँग्रेस च्या काळात 19 वेळा विधानसभा बरखास्त करून, स्वतःच्या पक्षाची विधानसभा देखील राष्ट्रपती राजवट लावली.त्यामुळे लोकशाही कुठ हुकुमशाही कुठ त्यामुळे मोदींच्या काळात हे करता येत होते.३०३ भाजपचे खासदार आणि सहयोगी असे मिळून ३५३ सहज शक्य होत अशी भूमिका त्यांनी मांडत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी टीका केली.

आणखी वाचा – वंचित बहुजन आघाडी भाजपाची ‘बी’ टीम? चंद्रकांत पाटील हसत म्हणाले…

देवेंद्र फडणवीस त्यावर पुस्तक लिहतील

पहाटेच्या शपथ विधी बाबत जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.त्यावर देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार भूमिका मांडत नाही.त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही प्रश्नांची उत्तर कधीच मिळत नसतात.देवेंद्रजी शेवटी शेवटी त्यावर पुस्तक लिहितील.अशी भूमिका त्यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil statement thanks for the role of prakash ambedkar pune news svk 88 amy
First published on: 27-01-2023 at 22:23 IST