आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

चंद्रपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ड्रीम प्रोजेक्ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा प्रामुख्याने समावेश केला आहे. परंतु औद्योगिकदृष्टया महत्त्वाच्या बल्लारपूर आणि चंद्रपूरचा समावेश यात केलेला नाही. नितीन गडकरी यांनी या विभागावर नेहमीच भरभरून प्रेम करत विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पात त्यांनी बल्लारपूर आणि चंद्रपूरचा समावेश करावा अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.  या शहरांचा सदर प्रकल्पात त्वरित समावेश करण्याचे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले व चर्चा केली. ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पात बल्लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.  देशाच्या विभिन्न भागातून महत्त्वपूर्ण रेल्वे गाडय़ा बल्लारपूर व चंद्रपूर या शहरातून जातात.  या दोन्ही शहरांचा समावेश या प्रकल्पात झाल्यास या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. सदर प्रस्तावित प्रकल्पात  या दोन्ही शहरांचा समावेश करण्यात येईल असे आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. यावेळी  फेडरेशन ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चंद्रपूरचे पदाधिकारी रामजीवन परमार, दिनेश बजाज, अनिल टहलीयानी यांची उपस्थिती होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur included broad gauge metro project sudhir mungantiwar ssh
First published on: 18-07-2021 at 00:20 IST