संभाजीराजे भोसले यांना राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये फसवले आहे, असा गंभीर आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पत्रकारांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना ‘भाजपाने देखील संभाजीराजेंचा गेम केला का?’ असा प्रश्न विचारला. यावर छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “संभाजीराजेंच्या वडिलांनी सविस्तर चर्चा केली आहे. कुठेही आमच्या घराण्याचा अपमान झाला नाही. यात मुख्यमंत्र्यांसह कोणाची चूक नाही,” असं सांगितल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ म्हणाले, “संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज यांनी काल सविस्तर राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा केलीय. त्यांनी सांगितलं आहे की कोठेही आमच्या घराण्याचा अपमान झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो की इतर कोणाचीही यात चूक नाही. तो ड्राफ्ट होता, कायमस्वरुपी मान्य केलेला कागद नव्हता. अशा अनेक चर्चा त्यांनी केल्या.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : भुजबळ, खडसेंचा त्रागा अन् शिवसेनेचे मौन

“मला वाटतं आता आपण ही चर्चा थांबवली पाहिजे. छत्रपती घराणं महाराष्ट्रात सर्वांना प्रिय आहे. खासदार असले काय, नसले काय, त्यांच्याबद्दलचा आदर जनमाणसात कोठेही कमी होणार नाही,” असंही छगन भुजबळ यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal comment on sambhajiraje chhatrapati rajyasabha election issue pbs
First published on: 29-05-2022 at 21:04 IST