Chhagan Bhujbal : संतोष देशमुख हत्या प्रकरण ९ डिसेंबर २०२४ पासून चर्चेत आहे. कारण याच दिवशी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची बातमी समोर आली. वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. दरम्यान या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. आज तो राजीनामा अखेर घेण्यात आला आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रात्रीच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा होते आहे. तसंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. हा राजीनामा आता झाला आहे. यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीम्याबाबत काय म्हटलंं आहे?

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.” तर छगन भुजबळ यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे?

धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे हे मला आत्ताच समजलं आहे. यासंदर्भात आता पुढची जी काही भूमिका पक्षाचे अध्यक्ष अजित पवार लवकरच जाहीर करतील. पक्षाची भूमिका हीच होती की कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठिशी घालणार नाही. आमची भूमिका न्यायाचीच राहिल. कुठल्याही चुकीच्या कृत्याला आम्ही समर्थन देणार नाही. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिला आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगेनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट

मनोज जरांगे पाटील यांनी आज (४ मार्च) देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, एकच फोटो बघून मी डोळे झाकले, मला सगळे फोटो बघवलेच गेले नाही. मी तुटून गेलोय, काय करावं काही समजत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आरोपींना कसं वाचवलं जाईल याचं नियोजन केलं जातंय. पण मारेकऱ्यांना नियती माफ करणार नाही अशी भावना देशमुख माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.