मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. “एकदा आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो. खूप दिवस झालं तुझी फडफड चालू आहे,” असा एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांनी भुजबळांना लक्ष्य केलं होतं. याला भुजबळांनी प्रत्युत्तर देत “मी असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही”, असं म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, “मी असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही. मी आयुष्यभर अन्याय आणि दादागिरीविरोधात लढलो आहे. त्यांच्या जन्माच्या आधीपासून लढतोय.”

“तुम्ही आरे म्हणाले तर कारे म्हणणारचं”

“जरांगे-पाटील छाती ठोकून मोठ्या गर्जना करतात. एकतर १२ इंच छाती आहे, ठोकून-ठोकून काहीतरी गडबड होईल. त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी. तुमची लढाई लोकशाही मार्गानं लढावी. तुम्ही आरे म्हणाले तर कारे म्हणणारचं… मला कुणाविरोधात बोलण्याची हौस नाही,” असं भुजबळांनी ठणकावलं.

हेही वाचा : मनोज जरांगे-पाटलांचं २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण, मुख्यमंत्री पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “कुणीही…”

“घरं, हॉटेल मी जाळली का?”

“माझ्याशिवाय जरांगे-पाटील भाषणात काय बोलणार? जरांगे-पाटलांच्या स्मरणशक्तीत थोडीशी गडबड झाली आहे. कारण, जरांगे-पाटील भाषणात दुहेरी बोलतात. जरांगे-पाटील सुरूवातीला म्हणायचे, ‘बीडमधील घरे, हॉटेल सरकारी अधिकाऱ्यांनी जाळली.’ आता म्हणत आहेत, ‘हॉटेल घरे भुजबळांनी जाळली.’ म्हणजे प्रकाश सोळंकेचं घर, संदीप क्षीरसागरांचं कार्यालय, जयदत्त क्षीरसागरांचं शिक्षण संस्था मी जाळल्या का?” असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण”, बीडमधून जरांगे-पाटलांची मोठी घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बीडला जाळपोळ तुम्हीच केल्याचं कबूल करत आहात”

“सभेत जरांगे-पाटील म्हणतात की, ‘मराठ्यांच्या वाटल्या जाऊन नका नाहीतर बीडला काय होते ते लक्षात ठेवा.’ म्हणजे बीडला जाळपोळ तुम्हीच केल्याचं कबूल करत आहात. त्यामुळे उलट-सुलट भाष्य येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे,” असा सल्ला भुजबळांनी जरांगे-पाटलांना दिला आहे.