मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने अनेकवेळा आश्वासन देऊनही आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करावा, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. ही मागणी घेऊन जरांगे पाटील मराठा समुदायाचा मोर्चा घेऊन २० जानेवारी रोजी मुंबईत धडक देणार आहेत. दुसऱ्या बाजूला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील शाब्दिक युद्ध चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संध सोडत नाहीत.

एकीकडे छगन भुजबळ हे ओबीसी समाजाला मराठा समाजाविरोधात भडकावत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. तर दुसऱ्या बाजूला, मराठा आंदोलनादरम्यान, राज्यात बीडसह इतर काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारास मनोज जरांगे पाटील जबाबदार असल्याचा आरोप भुजबळ सातत्याने करत आहेत. अशातच छगन भुजबळ यांनी शनिवारी (१३ जानेवारी) बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

two youth beaten badly in pub
पबमध्ये नृत्य करणाऱ्या तरूणीला धक्का लागला अन् राडा झाला…  
ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
ramdas tadas
‘‘हे एकदाचं थांबवा,” रामदास तडस यांना भाजप नेत्यांचा निर्वाणीचा इशारा

छगन भुजबळ म्हणाले, ते उपोषणकर्ते (मनोज जरांगे पाटील) सांगतात की, तीन कोटी मराठा समुदायाला घेऊन ते मुंबईत जाणार आहेत. हे सगळे लोक कामधंदा सोडणार आणि तुमच्यामागे मुंबईत जाणार…तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार. तुम्ही नुसती चक्कर मारणार… काय तर म्हणजे जवान नेता…पण दोन-चार बैठका घेतल्या की हॉस्पिटलमध्ये झोपणार.

हे ही वाचा >> “…तर हे लोक झेंडे लावायला मंदिरावर चढू शकले नसते”, ‘त्या’ घटनेची आठवण करून देत उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे असलेल्या नेत्यांना उद्देशून छगन भुजबळ म्हणाले, जे शांत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही काही बोलणार नाही. परंतु, जे आमच्याविरोधात त्यांना (मनोज जरांगे यांना) शक्ती देत आहेत, त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल. जे काही चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल.