जत तालुक्यातील वंचित ६५ गावासाठी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. याचबरोबर योजनेसाठी दोनशे कोटींचा तातडीचा निधीही मंजूर केला.

हेही वाचा- राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक, संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांचा…”

जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांना पाणी मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आक्रमक भूमिका मांडली. जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मांडत सध्याची परिस्थिती व तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पूर्णत्वासाठी तातडीने निधी मिळणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले. यावर मुख्यमंत्र्यांनी दोनशे कोटींचा तातडीचा निधी मंजूर करुन पुरवणी अर्थसंकल्पामध्येही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच जसे काम सुरू होईल तसे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

हेही वाचा- सुरगणातील गावे गुजरातला जोडा…राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांची मागणी, नंतर सारवासारव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सांगलीचे पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे, खा. संजयकाका पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी तसेच पाटबंधारे विभागाचे व विविध अधिकारी उपस्थित होते.