महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करणार होते. मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना विरोध दर्शवला. आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही असं अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी सांगितलं होतं. असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याबाबत मुख्यमंत्री एका वाक्यात संजय राऊत यांच्या सगळ्या दाव्यातली हवाच काढून घेतली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

संजय राऊत यांच्या दाव्याविषयी जेव्हा एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, “कोण संजय राऊत? शीतल म्हात्रेंना काही विचारायचं तर विचारा, मला जरा चांगले प्रश्न विचारा. ” अशा तीन वाक्यांमध्ये संजय राऊत यांनी केलेला दावाच उडवून लावला आहे.

amchi dena bank lena bank nahi cm Eknath Shinde criticized opposition on Monday
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
Eknath Shinde on Mahim
Eknath Shinde : माहीममध्ये महायुतीचा पाठिंबा कोणाला? सदा सरवणकरांना समर्थन की मनसेला साथ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं?

२०१४ मध्ये भाजपाने शिवसेनेची युती केली. त्यानंतर परत त्यांनी युती केली. तेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो. २०१९ भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यांनी चर्चेचीही तयारी दर्शवली नाही. त्यामुळे भाजपासह सरकार स्थापन करण्याचा प्रश्न आला नाही कारण ते सरकार बनवण्याच्याच तयारीत नव्हते. उदय सामंत जे सांगत आहेत खोटं आहे. उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. उदय सामंत यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या आमचं सरकार आलं तर ते आमच्या दारात असतील पण आम्ही त्यांना सत्तेत घेणार नाही. एकनाथ शिंदेंना त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असतं तर आज त्यांची भूमिका वेगळी असती. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अजित पवार आणि राष्ट्रवादीने विरोध केला

एकनाथ शिंदेंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक काम करत आहेत. अजित पवारांपासून वळसे पाटील यांच्यासह सगळे काम करत नाहीत. आमच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन करताना या सगळ्यांचा एकच हेका होता की आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही. या गोष्टीचे पुरावे आहेत. वारंवार राष्ट्रवादीचा एकच हेका आणि ठेका होता. कुणाला विधीमंडळाचा नेता करता आहात ते पाहा आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही. एकनाथ शिंदेंच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून विरोध करणाऱ्यांमध्ये त्यावेळी अजित पवार होते, जयंत पाटील, सुनील तटकरे या सगळ्यांचं हेच म्हणणं होतं. असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांनी मांडलेला हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तीन वाक्यांमध्ये संपवला आहे.