Eknath Shinde Dasara Melava 2022 Updates at BKC Ground : दसऱ्यानिमित्त राज्यात आज (५ ऑक्टोबर) तीन मोठ्या राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे झाले. यात पहिला मेळावा दुपारी भगवान भक्तीगडावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा झाला. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर सुरू झाला. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेना आणि महाविकासआघाडीवर सडकून टीका केली. वाचा दसरा मेळाव्यातील घडामोडींच्या प्रत्येक अपडेट्स…
व्हिडीओ पाहा…
Eknath Shinde Dasara Melava 2022 Updates : दसऱ्यानिमित्त राज्यात होत असलेल्या दसरा मेळाव्यांच्या अपडेट्स, वाचा प्रत्येक घडामोडीचा आढावा…
बाळासाहेबांचे विचार तोडून, मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आमदारांनी विरोध केला, मी त्यांना सांगितलं, मला काही नको. पण, छातीवर दगड ठेऊन मी त्यांच्यासोबत राहिलो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती, मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला. नारायण राणे बोलले, बाळासाहेब ठाकरे असते हा मुख्यमंत्री झाला नसता. तुमची लायकी तुम्ही काढताय, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
कोणत्या समाजासह तुम्ही राहिला. मराठा मोर्चे निघाले तेव्हा मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणाला. मराठा समाज सांगतो बरोबर, त्यांच्या वाट्याल कोणी जाऊ नये. मराठा, ओबीसी, एसी, एसटी हे सगळे आपले आहेत. या राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वांना समान न्याय दिला जाईल. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
तुम्ही स्वतः सांगता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कंत्राटी आहे. हो मी यापूर्वीही सांगितलं, आजही सांगतो, होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी या राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. या राज्यातील सगळ्यांना न्याय देण्याचं मी कंत्राट घेतलंय. या राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचं मी कंत्राट घेतलंय. हे सरकार योग्य कंत्राटदाराच्या हातात गेलंय, त्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका, तुमची काळजी करा.
– एकनाथ शिंदे
तुम्ही आम्हाला काय काय म्हणालात. ४० रेडे काय, गटारातील घाण काय, डुक्कर काय, टपरीवाला, रिक्षावाला, पानवाला आणि आणखी बरंच काही म्हटले. असं म्हणणारे आता कोठे आहेत? आपल्यावर बोलल्यावर काय होतं माहिती आहे ना.
– एकनाथ शिंदे
या देशाच्या उभारणीत आरएसएसचं मोलाचं योगदान आहे. या देशावर आलेली प्रत्येक आपत्ती आणि संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकदिलाने काम करताना आपण पाहिलं आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती-संकट येतं तेव्हा आरएसएस पुढे असते. राष्ट्र उभारणीच्या पवित्र कार्यात या संघटनेचा हात कुणीच धरू शकत नाही. तुम्ही आरएसएसची आणि पीएफआयची तुलना करता. अरे थोडी तरी काही तरी वाटली पाहिजे. मनाची नाही, तर जनाची तरी वाटली पाहिजे. आरएसएसवर बंदीची मागणी अतिशय हास्यास्पद आणि मुर्खपणाची आहे.
– एकनाथ शिंदे
तुमचा कारभार कुणालाही आवडत नव्हता. कोविड कोविड करून तुम्ही सर्वांना घरात बसवलं. दुकानं बंद केली, मंदिरं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या, पण तुमची दुकानं सुरूच होती. कसली दुकानं सुरू होती हे मी बोलत नाही, पण चालू होती हे मला माहिती होतं. माझ्याशिवाय जास्त कुणाला माहिती असणार आहे.
– एकनाथ शिंदे
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलं ते शिवसैनिक कधीही विसरणार नाही. म्हणून महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केलंय त्यासाठी आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, मग आमच्यावर बोला.
– एकनाथ शिंदे
आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचा शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे.
– एकनाथ शिंदे
ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची आहे, ना एकनाथ शिंदेंची आहे. ही शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना आहे. ही तुम्हा तमाम शिवसैनिकांची शिवसेना आहे. आम्ही सत्तेसाठी लाचारी करून शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणारही नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि स्वत्व महत्त्वाचं आहे.
– एकनाथ शिंदे
बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा हरामखोर असा उल्लेख केला त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली होती. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाल्या असतील. त्यामुळेच आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, बाळासाहेबांच्या विचारांची जपवणूक करण्यासाठी हिंदुत्वासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी ही भूमिका घेतली. आम्ही ही भूमिका जाहीरपणे घेतली, लपून छपून घेतली नाही.
– एकनाथ शिंदे
बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. तुम्ही त्यांच्या तालावर नाचू लागला आणि आम्हालाही नाचवायला लागलात.
– एकनाथ शिंदे
मी नतमस्तक झालो कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातून एवढा मोठा जनसमुदाय आलाय. काही लोक तर रात्रीच आले. पाचची सभा होती, मात्र अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आधीच आले होते. म्हणून मला तुमच्यासमोर डोकं टेकवावं वाटलं.
– एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, विचारांना तिलांजली दिली. मग तुम्हाला त्या जागेवर उभा राहण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का? हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त, सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण टाकला.
– एकनाथ शिंदे
मी नतमस्तक झालो कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातून एवढा मोठा जनसमुदाय आलाय. काही लोक तर रात्रीच आले. पाचची सभा होती, मात्र अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आधीच आले होते. म्हणून मला तुमच्यासमोर डोकं टेकवावं वाटलं.
– एकनाथ शिंदे
आज आमच्यावर आरोप होत आहेत. यांनी शिवसेनेसाठी काय केलंय असं विचारलं जातंय. शिवसेनेसाठी आमच्यावर झालेल्या केसेस चेक केल्या तर १९९२ च्या दंगलीत आमच्यासारखा कार्यकर्ता, आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप एकाच बॅरेटमध्ये तुरुंगात होतो. जळगाव जिल्ह्याचा इतिहास सांगायचा तर, कन्हैय्या बंधुंना कोठडीत मारलं गेलं. काँग्रेसच्या राजवटीत या दोन भावांचा माळवदे नावाच्या व्यक्तीने खून केला. त्यामुळे ही शिवसेना वाढली.
– गुलाबराव पाटील
Dasara Melava 2022 Latest News: आज बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या दसरा मेळाव्याच्या भाषणातून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सविस्तर बातमी
आज आमच्यावर आरोप होत आहेत. यांनी शिवसेनेसाठी काय केलंय असं विचारलं जातंय. शिवसेनेसाठी आमच्यावर झालेल्या केसेस चेक केल्या तर १९९२ च्या दंगलीत आमच्यासारखा कार्यकर्ता, आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप एकाच बॅरेटमध्ये तुरुंगात होतो. जळगाव जिल्ह्याचा इतिहास सांगायचा तर, कन्हैय्या बंधुंना कोठडीत मारलं गेलं. काँग्रेसच्या राजवटीत या दोन भावांचा माळवदे नावाच्या व्यक्तीने खून केला. त्यामुळे ही शिवसेना वाढली.
– गुलाबराव पाटील
Dasara Melava 2022 Latest News: आज बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणातून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा दाखला देत शहाजीबापू पाटलांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. सविस्तर बातमी
शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यात आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “कुणाकडे फोन असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करा आणि त्यांना दोन मिनिटे येथे येऊन बघून जायला सांगा. मग खरी शिवसेना कोणती हे त्यांना कळेल”, असा शाब्दिक हल्ला या मेळाव्यात बापूंनी उद्धव ठाकरेंवर चढवला.
शिंदे गटातील खासदारांचे प्रतिनिधी आणि लोकसभेमधील शिवसेनेचे गटनेते असणाऱ्या राहुल शेवाळेंनी शहाजीबापू पाटील यांच्यानंतर भाषण केलं. या भाषणामध्ये राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री हे रुग्णालयामध्ये असताना बंडखोर आमदारांनी पक्ष फोडण्याचा कट रचल्याची टीका आदित्य यांनी अनेक ठिकाणी केली. मागील तीन महिन्यांपासून आदित्य यांनी हे विधान अनेकदा केलं असून याच विधानावरुन शेवाळेंनी आदित्य यांना टोला लगावला. येथे वाचा सविस्तर वृत्त…
“बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडल्याची टीका करणारे स्वत: स्विझर्लंडला होते”, “ठाकरे लंडनला असायचे तेव्हा आम्ही नालेसफाई…”https://t.co/kg0NITrPM4
— LoksattaLive (@LoksattaLive) October 5, 2022
आदित्य ठाकरेंवर केली टीका#Dasara #EknathShinde #UddhavThackeray #AdityaThackeray
चिपळ्या वाजवणारा एकनाथ यांना जवळच्यांनी संपवलं. एकनाथ शिंदेंना एकटानाथ होऊन देऊ नका. हा एकनाथच राहुन द्या, ही तुम्हाला विनंती आहे. एकनाथ शिंदे गोरगोरीब आणि शेतकऱ्यांची कामे करत आहेत. शेतकरी राबतो म्हणून दोन दाने आपल्या पोटात जातात. एकनाथ शिंदे हे राबकरी, कष्टकरी आणि मेहनत करणार आहे. त्यांना दुरावा देऊन नका. राज्यातील विधानसभा बरखास्त करा, परत निवडणूक घ्या आणि शिंदेराज्य येऊद्या, अशी मागणी जयदेव ठाकरे यांनी केली आहे.
नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही आम्हाला असेच आदेश यायचे की, चेंबुरचे कार्यालय फोडा. माझी पत्नी इथं उपस्थित आहे. माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मी रुग्णालयात होतो. त्याचा फक्त चेहरा बघितला आणि लगेच साहेबांचा मातोश्रीवरुन आदेश आला की, कणकवलीला जा आणि नारायण राणेंविरोधात सभा घ्या. लगेच आम्ही बॅग भरून त्या सभेला गेलेलो. आयुष्यातील एवढे महत्त्वाचे क्षण आम्ही संघटनेला दिले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसाठी दिले. त्या क्षणांची किंमत कधीच खोक्यात होऊ शकत नाही.
– राहुल शेवाळे
याच युवराजांना आम्ही सांगू इच्छितो की, छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले तेव्हा आम्ही सर्वजण शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिलो. त्यावेळी युवराजांनी आपल्या वडिलांना विचारायला हवं होतं की किती खोके आम्हाला त्यावेळी दिले. २००५ मध्ये राज ठाकरे शिवसेना सोडून गेले तेव्हाही आम्ही आम्ही शिवसेनेला साथ दिली. शिवसेनाप्रमुखांना साध दिली. तेव्हा किती खोकी दिली याचाही आम्हाला हिशोब मिळायला पाहिजे. तेव्हा तर आम्हाला असे आदेश होते की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरावर मोर्चा काढा. कार्यालयावर मोर्चे काढा, त्यांना शिव्या घाला, त्यांच्यावर आरोप करा, असे आरोप आम्हाला मातोश्रीवरून वारंवार येत होते.
– राहुल शेवाळे
खोक्यांचं तुणतुणं सतत आमच्या कानावर येतं. युवराज नेहमीच हे पारायण प्रत्येक भाषणात करत असतात. कारण युवराजांचं लहानपण खोक्यातूनच गेलं आणि खोक्यापासूनच झालंय. महानगरपालिकेच्या माध्यमातून जे खोके मिळाले त्या खोक्यातूनच युवराज लहानाचे मोठे झाले.
– राहुल शेवाळे
एनटी रामाराव यांच्याविरोधात जावयाने बंड केला. तेव्हा एनटी रामारावांनी माझा बाप जावयाने चोरला असा आरोप केला नाही. अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्या पक्षातही वाद झाला. मात्र, अखिलेशच्या काकाने अखिलेशचा बाप चोरला असा आरोप झाला नाही. जीवंत उदाहरण म्हणजे चिराग पासवान. चिराग पासवान यांच्या पक्षातही फुट पडली. मात्र, त्यांनीही कधी माझा बाप माझ्या काकांनी चोरला असा आरोप केला नाही. परंतु हिंदुस्तानाच्या राजकारणातील ही एकमेव व्यक्ती जिने बाप चोरीला गेला असं म्हणतो. हिंदुस्तानच्या इतिहासाच या सर्व गोष्टींचा उल्लेख होईल.
– राहुल शेवाळे
शिवसेना प्रमुखांना चोरले असा आरोप अत्यंत दुर्दैवी आहे. हिंदुस्तानच्या राजकारणात कधीच कोणत्याच नेत्याने या गोष्टीचा उल्लेख केला नाही. याचं जीवंत उदाहरण म्हणजे १९७० मध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधींविरोधात वेगळा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इंदिरा गांधींनी कधीच म्हटलं नाही की माझा बाप जवाहरलाल नेहरू चोरला.
– राहुल शेवाळे
मला स्वप्नातही वाटलं नाही की, मी राहुल रमेश शेवाळे याला या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळेल. मी राहुल रमेश शेवाळे या नावाचा वारंवार करत आहे, कारण मी कुणाचा बाप चोरलेला नाही. माझं नाव राहुल रमेश शेवाळे आहे. माझे वडील रमेश संभाजी शेवाळे हे होते, हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. कारण वारंवार आमच्यावर आरोप होतो की माझा बाप चोरला.
– राहुल शेवाळे
आमच्यावर आरोप झाले की, बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडला, जाण्याचे कारस्थान रचले जात होते. जेव्हा उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेव्हा टीका करणारे स्वत: (आदित्य ठाकरे) स्विझर्लंड येथे व्यापारी परिषदेला गेले होते. त्यांचा विभाग नसताना ते गेले होते. जेव्हा जून महिना यायचा तेव्हा ठाकरे इंग्लंडला जायचे. आम्ही इथे नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत असायचो.
– राहुल शेवाळे
तुम्ही महाराष्ट्र शांत ठेवण्याऐवजी भडकवत आहात. भांडण लावत आहात. मारामाऱ्या कुणाच्या? पाटलाला देशमुख मारणार, जाधवाला यादव मारणार, बनसोडेला कांबळे मारणार, हे मात्र, इथं मातोश्रीवर पोहे खात बसणार. आमची पोरं एकमेकांची टकुरी फोडणार. हे आता बंद झालंय.
– शहाजीबापू पाटील
एखाद्या मेलेल्या कुत्र्याला फरफटत उकिरड्यावर टाकतात, तसं तुम्ही सगळ्या आमदारांना फरफटत नेलं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उकिरड्यावर आम्हाला फेकून दिलं. हे उद्धव ठाकरेंनी केलेलं पाप आहे. ते पाप खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंनी धुतलं. एकनाथ शिंदेंनी गद्दारी केलेली नाही. झालेल्या चुकीचं प्रायश्चित घेण्यासाठी धाडसाने उचलेलं एक पाऊल आहे. हे पाऊल महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नसतं, तर महाराष्ट्रात ४०-४५ मेळावे झाले नसते.
– शहाजीबापू पाटील
गुलाबराव मी काँग्रेसमध्ये होतो आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची दसऱ्याची सभा टीव्हीवर कायम ऐकायचो. तुम्हीही ऐकत असाल. हिंदुह्रदयसम्राट मैद्याचं पोतं कुणाला म्हणाले? शरद पवार. मोठ्याने नाव घ्या घाबरू नका. बारामतीचा महमद्या कोणाला म्हणाले, शरद पवार. दाऊदचा हस्त आहे कोणाला म्हणाले, शरद पवार. ही इलायती सोनिया गांधी मला चालणार नाही, कोण म्हणाले, तर हिंदुह्रदयसम्राट म्हणाले.
– शहाजीबापू पाटील
माझ्या मनात एक इच्छा आहे. तुमच्याकडे कुणाकडे फोन असेल तर त्यांनी त्या उद्धव ठाकरेला फोन करा आणि दोन मिनिटे इथं येऊन हे बघून जा म्हणावं. मग खरी शिवसेना कुठली हे कळेल.
– शहाजीबापू पाटील
छगन भुजबळ, नवाब मलिक यांचे नाव घेत शिंदे गटाचा महाविकास आघाडीवर हल्ला, बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेवरून आणि दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरूनही टीका, “कुणी केली गद्दारी, तुम्हीच केली गद्दारी”, गाण्यातून शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
हल्ली एक लहान लेकरू आमदार झालंय, मंत्रालयात जायला लागलं, कॅबिनेट मंत्रीही झाले. ते माध्यमांना सांगत आहेत की, नवीन मंत्रीमंडळ आल्यावर सगळे धंदे गुजरातला जायला निघाले आहेत. आपण त्याच्या ज्ञानाची किव करावी अशी स्थिती आहे. मुंबईतील किती धंदे बाहेर गेले, कसे गेले याचा या बाबाने अभ्यास करावा. तुझ्या बाबांकडून समजून घे. म्हणजे याची तुला कल्पना येईल.
– किरण पावसकर
“या मातीच्या कणाकणातून, गहिवरे वास व श्वास तुझा, आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी”, गुलाबराव पाटील यांच्याकडून एकनाथ शिंदेंवर गाणं, निहार ठाकरे शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी हजर, बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्ती चंपासिंह थापा यांचीही हजेरी
संदेश उमप यांच्याकडून आनंद दिघेंवर पोवाडा सादर
“अनाथांचा नाथ, गरिबांना साथ, एकनाथ”, अवधुत गुप्तेंकडून एकनाथ शिंदेंवर गाणं सादर, उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी समर्थकांची गर्दी
गायक संदेश उमप यांच्या गाण्यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात,
VIDEO: बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या समर्थकांना बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पाहा ड्रोनमधून टिपलेली दृश्ये…
VIDEO: बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याची तयारी कशी? पाहा ड्रोनमधून टिपलेली दृश्ये…#EknathShinde #DasaraMelava #Shivsena pic.twitter.com/pRIVLUUP5P
— LoksattaLive (@LoksattaLive) October 5, 2022
प्रताप सरनाईक आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, “हेच ते भगवे वादळ… हीच ती गर्जना! दसरा मेळाव्याचा सुवर्ण क्षण आता अगदी समीप येऊन ठेपला आहे. आजचा ऐतिहासिक असा दसरा मेळावा हा हिंदुत्वाची ललकार आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा अंगार आहे.”
हेच ते भगवे वादळ…हीच ती गर्जना ! #दसरा मेळाव्याचा सुवर्ण क्षण आता अगदी समीप येऊन ठेपला आहे. आजचा ऐतिहासिक असा दसरा मेळावा हा #हिंदुत्वाची ललकार आहे, वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा अंगार आहे….#bkc #DasaraMelava #Dasara2022 pic.twitter.com/m2AlaRwUoQ
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 5, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दसरा मेळाव्याच्या तयारीचा वर्षा बंगल्यावरून आढावा, साडेपाचला नंदेश उमप यांच्या गाण्याने मेळाव्याला सुरुवात होईल. त्यानंतर शितल म्हात्रे, शहाजीबापू पाटील, गुलाबराव पाटील, रामदास कदम, आनंदराव आडसूळ, राहुल शेवाळे यांची भाषणं होतील. त्यानंतर एकनाथ शिंदे भाषण करतील असाही अंदाज वर्तवला जातोय. साधारपणे सायंकाळी सातवाजता शिंदे बीकेसी मैदानावर दाखल होतील. यानंतर आठ ते साडेआठ या वेळेत ते भाषणासाठी उभे राहतील.
बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दसरा मेळावा पार पडत आहे. या दसरा मेळाव्याला बीड जिल्ह्यासह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणातून २०२४ च्या निवडणुकीत लढण्याचे संकेत दिले आहेत. तसेच दसरा मेळाव्यासाठी हजर झालेल्या लोकांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था करण्याचीही आपली ऐपत नाही, असं विधानंही केलं आहे. सविस्तर वृत्त
आता विषय संपला, आपण आपलं काम करुया. तुम्ही कुणीही पदाची अपेक्षा करायची नाही. माध्यमांनीही चर्चा करायची नाही – पंकजा मुंडे
“जितना बदल सकते थे खुद को बदल दिया हमने, अब जिनको शिकायत है वह खुद को बदले” असं माझं सांगणं आहे. मी तुमच्यासाठी रोज मैदानात असणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या नावाला बड्डा लागेल असं वागणार नाही. मी उतणार नाही, मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही – पंकजा मुंडे
मी पदर पसरून कुणाकडे काही मागायला जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपल्या मतदारसंघात जावं आणि आपली वज्रमुख आवळा – पंकजा मुंडे
“जरुरत से जादा इमानदार हू मैं, इसलिए सबके नजरों में गुनहगार हु”. मला आता पक्षाला त्रास द्यायचा नाही. कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचं नाही. आपण आपलं शांत राहायचं. मी दुर्गेचं रुप धारण करावं असं तुम्हाला वाटतं, ते मी करेन – पंकजा मुंडे
“माना की औरों के मुकाबले कुछ पाया नही मैंने, पर खुद को गिरा के कुछ उठाया नही हमने”. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, श्रद्धा आहे, आस्था आहे, निष्ठा आहे, माझ्यावर विश्वास आहे, तर मला शोभेल असं वागा. पक्षाने तिकीट दिलं तर मी २०२४ च्या तयारीला लागणार आहे. माझं असंच आहे – पंकजा मुंडे
मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी नाराजीचा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे – पंकजा मुंडे
माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. इतके दिवस मी कधीच यावर बोलले नाही. मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. मी मंत्री असताना मोनिका राजळे आणि इतरांना हाताने वाढून जेवू घालत होते – पंकजा मुंडे
दसऱ्यानिमित्त राज्यात राज्यात होत असलेल्या दसरा मेळाव्यांच्या लाईव्ह अपडेट्स, वाचा प्रत्येक घडामोडींचा आढावा…