पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर ठरवत बंदी घातली आहे. या संघटनेवरील बंदीनंतर राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि केरळमधील काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. आरएसएसवर बंदीची मागणी अतिशय हास्यास्पद आणि मुर्खपणाची आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “या देशाच्या उभारणीत आरएसएसचं मोलाचं योगदान आहे. या देशावर आलेली प्रत्येक आपत्ती आणि संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकदिलाने काम करताना आपण पाहिलं आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती-संकट येतं तेव्हा आरएसएस पुढे असते.”

हेही वाचा – “तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्र उभारणीच्या पवित्र कार्यात या संघटनेचा हात कुणीच धरू शकत नाही. तुम्ही आरएसएसची आणि पीएफआयची तुलना करता. अरे थोडी तरी काही तरी वाटली पाहिजे. मनाची नाही, तर जनाची तरी वाटली पाहिजे. आरएसएसवर बंदीची मागणी अतिशय हास्यास्पद आणि मुर्खपणाची आहे,” असे प्रत्युत्तर बंदीची मागणी करणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.