राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या मंगळवारी (८ ऑगस्ट) होणार असे म्हटले जात आहे. यावेळी एकूण १२ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल. मंत्र्यांची नावे अजून निश्चित झालेली नाहीत. ती झाली की तुम्हाला कळवू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. ते नांदेड, हिंगोली जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी लवकरच सांगितली जाईल. मंत्रिमंडळाची यादी अद्याप अंतिम झालेली नाही. आज रात्री तसेच उद्यापर्यंत ही नावे निश्चित केली जातील,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मागील अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिंदे गट यांच्यात बैठक झाली आहे. याच मुद्द्याला घेऊन फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत पाच ते सहा वेळा दिल्ली दौरा केला आहे. दरम्यान आजदेखील राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज महत्त्वाची बैठक झाली. शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी झालेल्या बैठकीत कोणाला किती जागा तसेच खातेवाटपावर चर्चा करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

कोणाला संधी मिळणार?

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्यची शक्यता आहे. तसंच शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

भाजपामधून कोणाला संधी मिळणार?
१) चंद्रकांत पाटील
२) सुधीर मुनगंटीवार
३) गिरीश महाजन
४) प्रवीण दरेकर
५) राधाकृष्ण विखे पाटील
६) गणेश नाईक

शिंदे गटातील संभाव्य मंत्री कोण?
१) दादा भुसे
२) उदय सामंत
३) गुलाबराव पाटील
४) शंभूराज देसाई
५) दीपक केसरकर
६) सदा सरवणकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.