नांदेडपाठोपाठ नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात झालेल्या रुग्ण मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केल आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाकडून उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळाचा दाखला देऊन प्रत्युत्तर दिलं जात असताना दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी सीबीआय चौकशी करण्याची उद्धव ठाकरेंनी मागणी चांगली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया दिली. “त्यांनी केलेली ही चांगली मागणी आहे. कोविडच्या काळात घोटाळे झाले. अगदी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार त्यांच्या काळात झाला. नांदेडचा प्रकार अतिशय दुर्दैवी, वेदनादायी आहे. पण या मृतांचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची सवय ज्यांना लागली आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

amchi dena bank lena bank nahi cm Eknath Shinde criticized opposition on Monday
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Raju Patil criticizes Eknath Shinde and his son Shrikant Shinde
जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे पिता पुत्रांवर घणाघात
BJP worker Murder, Lonavla rural police,
हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मित्रासह तिघे गजाआड
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
After threat to UP CM Yogi Adityanath Mumbai Police received another threat message
योगींचा मृत्यू बाबा सिद्दीकीसारखा झाला, तर भारताची अवस्था हमास, इस्त्राईलसारखी आणखी एक धमकीचा संदेश

“…हे म्हणजे ‘उद्धवा अजब तुझा कारभार”, भाजपाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणे, “प्रश्न विचारला तर ते म्हणतात…!”

“ज्या लोकांनी मृतदेह ठेवायच्या पिशव्यांच्या व्यवहारात पैसे खाल्ले, ३०० ग्रॅमऐवजी १०० ग्रॅम खिचडी देऊन पैसे खाल्ले, ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले ते सगळं आता बाहेर येतंय. यावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अशी मागणी केली आहे. कोविडमध्ये झालेल्या प्रकाराची नक्की चौकशी होईल. औषधांची खरेदी चुकीच्या पद्धतीने झाली असेल, तर त्याची चौकशी सरकार करेल. नांदेड प्रकरणाची सरकार चौकशी करत आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“तोंडावर मास्क लावून…”

“कोविडमध्ये जे तोंडाला मास्क लावून घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते, त्यांनी माझ्यासारख्या रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या माणसाला शिकवू नये. मी जेव्हा पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करत होतो, तेव्हा हे घरात बसले होते. त्यांना भेटायला येणाऱ्यांचीही अँटिजेन टेस्ट करून दोन दोन तास बसवून नंतर भेटत होते. असे मुख्यमंत्री जगाने पाहिले नसतील. त्यामुळे कोविडमध्ये माणसं मरत असताना हे घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते. त्यांचा खरा चेहरा लोकांनी कोविडमध्ये पाहिलाय”, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला.

“साधा नगरसेवकही घरात बसून काम करू शकत नाही. मग राज्याचा मुख्यमंत्री घरात बसून काम करू शकतो असं विधान करणाऱ्यांनी दुसऱ्याला शिकवण्याची गरज नाही. एक फुल, एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.