राज्यातील माजी मंत्री आणि सांगलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील (५५) यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मदन पाटील हे सांगलीचे माजी खासदार आणि माजी आमदार होते. २००९ साली आघाडी सरकारमध्ये पाटील यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण, पणन आणि रोजगार हमी योजना मंत्री पदाचा कारभार सांभाळला होता. सांगली महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे ते नेते होते. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर आठचं महिन्यांत मदन पाटील यांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला दुसरा मोठा धक्का बसला आहे.