कंटेनरखाली सापडून बालक ठार

मुक्ताईनगर शहरातील साई चौकात दुपारी एका कंटेनरखाली सापडून आठ वर्षीय बालक जागीच ठार झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने कंटेनर चालकाला मारहाण केली.

मुक्ताईनगर शहरातील साई चौकात दुपारी एका कंटेनरखाली सापडून आठ वर्षीय बालक जागीच ठार झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने कंटेनर चालकाला मारहाण केली. शुभम बोदडे (८) असे या बालकाचे नाव आहे. मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचा असणारा शुभम आईसोबत येथे खरेदीसाठी आला होता. औरंगाबाद-बऱ्हाणपूर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बालक कंटेनरखाली सापडला. डोळ्यांसमोर ही घटना घडल्याने आईने हंबरडा फोडला. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन कंटेरनला अडविले आणि चालकाला चोप दिला. शहरातून महामार्ग गेल्यामुळे वारंवार अशा घटना घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. गोपाळ पारधी यांच्या तक्रारीवरून कंटेनर चालक हरपाल टेकाचंदसिंग याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Container crash child to death

ताज्या बातम्या