नगर: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या ‘सुपर वॉरिअर्स’शी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबाबत दिलेल्या सल्ल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या विरोधात बातम्या येऊ नयेत म्हणून पत्रकारांना दर महिन्याला चहा पाजा, धाब्यावर न्या, असा सल्ला दिला आहे. यावर वाद सुरु झाला आहे. विरोधकांनी बावनकुळेंवर टीका केली आहे. त्यावर बावनकुळेंनी सारवासारव करत, आपल्याला पत्रकारांचा आदर अपेक्षित आहे असे नमूद केले. पत्रकारांची मते जाणून घ्या, त्यांना आदराने वागवा असे म्हणायचे होते असे बावनकुळे यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘महाविजय-२०२४’ मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत ‘घर घर चलो’ अभियान राबवले जात आहे. खासदार डॉ. सुजय विखे प्रतिनिधित्व करत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील या अभियानाची सुरुवात बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी झाली. या वेळी बोलताना बावनकुळे यांनी वरील सल्ला दिला. या बैठकीला पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता. बावनकुळे म्हणाले, की एका ‘सुपर वॉरिअर्स’कडे चार बूथची जबाबदारी आहे. या चार बूथच्या क्षेत्रात कोणकोण पत्रकार राहतात, त्यांची यादी तयार करा. महाविजय-२०२४ अंतर्गत भाजपच्या विरोधात एकही बातमी येणार नाही याची काळजी सुपर वॉरियर्सनी घ्यावी.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

त्यासाठी या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहाला बोलवा, आता चहाला बोलवा म्हणजे काय हे तुम्हाला समजलेच असेल. बाकी काही असेल तर त्यासाठी खासदार विखे आहेतच. पत्रकारांना धाब्यावर न्या, परंतु बूथच्या कार्यक्षेत्रात भाजपच्या विरोधी एकही बातमी येता कामा नये. केवळ सकारात्मकच बातम्या यायला हव्यात असेही त्यांनी या वेळी सांगितले. सगळे पत्रकार विकले जाणार नाहीत असे टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. हा पत्रकारांचा अपमान आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Story img Loader