राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबादमध्येही सलग तीन दिवसांपासून नवीन कराबाधित रुग्ण आढळत आहेत. आज शहरात आणखी आठ रुग्णांची भर पडली. ज्यामुळे करोनाबाधितांची एकुण संख्या आता 128 वर पोहचली आह

अगोदरच रेड झोनमध्ये समावेश असललेल्या औरंगाबाद शहाराचा प्रवास आता करोनाच्या हॉटस्पॉटकडे चालल्याचे दिसत आहे. तीन दिवसांत शहरात झपाट्याने रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  विशेष म्हणजे आज सकाळीच शहरातील रुग्ण संख्येत 11 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यांनतर आणखी आठ रुग्ण आढळल्याने औरंगाबादकरांमध्ये आता चिंतेचे वातावरण  निर्माण झाले आहे.

आणखी वाचा- Coronavirus : महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण; एकूण आकडा ९ हजारांवर

शहरातील ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे, त्या भागात टाळेबंदी अधिक  कडक करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या आहेत. जिल्हा रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अडचणींबाबतही त्यांनी चर्चा केलेली आहे. त्यांच्याकडे पीपीई कीटची मागणी अधिकाऱ्यांनी नोंदवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.