करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य सरकारने गर्दी कमी करण्याकरिता निर्बंध कठोर केले आहेत. त्यानुसार राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली असून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येणार आहे. तसंच खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आलं आहे. सरकारी कार्यालयांची दारं अभ्यगतांसाठी बंद करण्यात आली आहेत. मॉल्स, चित्रपट आणि नाटय़गृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. तसंच उपाहारगृहांमध्ये ५० टक्केच प्रवेशाला परवानगी असेल. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध रविवारी मध्यरात्रीपासून अंमलात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निर्बंधांमध्ये धार्मिक स्थळं आणि दारुच्या दुकानांचा उल्लेख नसला तरी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मात्र त्यासंबंधी इशारा दिला. जालन्यात बोलताना त्यांनी गर्दी झाली तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असं सांगितलं असून धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होत असेल तर त्याबाबही निर्णय घेऊ असा इशारा दिला आहे. “एकाच वेळी जास्त गर्दी करु नये. मंदिरं बंद केलेली नाहीत, पण सामाजिक अंतर पाळलं जावं,” असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन: काय सुरु, काय बंद?; जाणून घ्या एका क्लिकवर

गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा सूचक इशारा राजेश टोपेंनी दिला असून ते म्हणालेत की, “राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढेपर्यंत तसंच हॉस्पिटलमध्ये बेड्स कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत”.

शाळाही बंद ठेवण्यात आल्यात मात्र दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितलं की, “गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल”. राज्यात ऑक्सिजनची मागणी नगण्य वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

“रोजीरोटी बंद करायची नाही, पण…”, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांची घोषणा करताच मुख्यमंत्र्याची पहिली प्रतिक्रिया

“१८ वर्षांवरील करोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला असा अहवाल असला तरी आयसीएमआरने याबाबतीत सूचना कराव्या, त्याची अंमलबजावणी केली जाईल,” असं राजेश टोपेंनी यावेळी सांगितलं. मुंबईतील कोविड सेंटरमध्ये पारदर्शकता नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असल्यासंबंधी विचारलं असता तक्रारीनंतर पारदर्शक चौकशी करून कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं.

राज्यात रात्रीची संचारबंदी लागू ; खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती

राज्यातील जनतेने हे निर्बंध सकारात्मकपणे घेऊन पालन करावं, तसंच जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करा असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं.

राज्यात कोणते निर्बंध लावले आहेत –

  • पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.
  • खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे.
  • सरकारी कार्यालयांची दारे अभ्यगतांसाठी बंद करण्यात आली आहेत.
  • लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
  • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
  • अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.
  • मॉल्स, व्यापारी संकुले : ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद.
  • उपाहारगृहांमध्ये ५० टक्केच प्रवेशाला परवानगी असेल. ग
  • शाळा व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय.
  • चित्रपट आणि नाटय़गृहे : ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी
  • जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार.
  • केसकर्तनालये ५० टक्के क्षमतेने रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
  • जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
  • प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.
  • रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतुकीवर कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नाहीत. जिल्हाबंदीही घालण्यात आलेली नाही. रेल्वे गाड्यांमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवास करण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. मास्क नसल्यास दंड ठोठावण्यात येईल. खासगी गाड्यांमधून प्रवास करताना मास्क आवश्यक असेल.
  • आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र सरकारच्या नियमांनुसार होणार. राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या प्रवासासाठी ७२ तासात केलेली RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid omicron maharashtra health minister rajesh tope liquor shop temples religious places restrictions sgy
First published on: 09-01-2022 at 13:46 IST