सोलापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींसह इतर महापुरूषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे अडचणीत आलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई होत असताना अन्य समर्थक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने एकत्र येऊन घोषणा देत असताना पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीमाराचे प्रकरण विधानसभेत उपस्थित झाले.याप्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलीस अधिका-यांवर कारवाईचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा >>> “काहींना सहवास लाभूनही बाळासाहेबांचे संस्कार…”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!

दरम्यान, फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर बेकायदेशीरपणे जमावाने एकत्र येऊन घोषणाबाजी करीत रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक रोखणा-या भिडे समर्थक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. याप्रकरणी ओंकार बालाजी सराटे, साईप्रसाद अवधूत दोशी, दिनेश मनोज मैनावाले, विशाल राजू जाधव,  अभिषेक बसवराज नागराळे, किरण रणजित पंगूडवाले, चंद्रकांत उमेश नाईकवाडे, संभाजी उमेश आडगळे, प्रेम विश्वनाथ भोगडे, अविनाश बाबूसिंग मदनावाले यांच्यासह ५० जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> VIDEO: “देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत गोलमाल उत्तर दिलं”, औरंगजेबच्या वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांच्या पारवानगीविना संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणा-या सुमारे १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही वेळातच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने दुचाकी  गाड्या उडवत फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर सार्वजनिक रस्त्यावर येऊन घोषणाबाजी केली. आंदोलक कार्यकर्त्यांना का ताब्यात घेतलात ? त्यांना तात्काळ सोडा, असा आग्रह धरत जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी भिडे हर हिंदू के घर में, अशा घोषणा देऊन सार्वजनिक वाहतूक रोखणा-या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता. यात तीन कार्यकर्ते जखमी झाल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत भाजपचे स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी प्रश्न उपस्थित करून लाठीमार करणा-या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजय देशमुख यांच्या शांत व संयमी स्वभावाचे कौतुक करून त्यांच्या मागणीची दखल घेत चौकशी करण्याचे जाहीर केले.