जिल्ह्यात सर्वत्र डेंग्यूची साथ पसरली असून, वसमतच्या नवोदय विद्यालयातील प्रतीक काळे यास डेंग्यूची लागण झाली. त्याला प्रारंभी िहगोली व नंतर नांदेडच्या रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. औंढा नागनाथ तालुक्यातही डेंग्यूची साथ पसरली आहे.
औंढा नागनाथ शहरातील नागेंद्र गल्लीत राहणाऱ्या चंद्रभागा जावळे यांना अचानक ताप आल्याने औंढय़ाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. शहरातील पंजेतन मोहल्ला, जिरेगल्ली, सोनारगल्ली व इतर भागांत तापाचे अनेक रुग्ण आढळून आले. आतापर्यंत १५जणांची तपासणी झाली. त्यांच्यावर उपचार झाल्याची नोंद आहे. खासगी रुग्णालयांतही अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2014 रोजी प्रकाशित
हिंगोलीत डेंग्यूची विद्यार्थ्यांला बाधा
जिल्ह्यात सर्वत्र डेंग्यूची साथ पसरली असून, वसमतच्या नवोदय विद्यालयातील प्रतीक काळे यास डेंग्यूची लागण झाली. त्याला प्रारंभी िहगोली व नंतर नांदेडच्या रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. औंढा नागनाथ तालुक्यातही डेंग्यूची साथ पसरली आहे.
First published on: 11-09-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue in hingoli