वाई : ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरमध्ये हवामानात मोठा बदल झाला आहे. महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात पारा घसरल्याने येथे दाट धुके आणि थंडी पसरली आहे. वेण्णालेक जेट्टीसह वेण्णालेक परिसरात मोठ्या प्रमाणात दवबिंदू पडल्याचे पाहावयास मिळाले. वेण्णालेक परिसराचे तापमान सहा अंशावर, तर महाबळेश्वर नऊ अंशावर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अचानक घसरलेल्या तापमानामुळे पर्याटकांसह स्थानिकही गारठल्याचे दिसून आले.

हेही वाचा – नागपूर : पवार यांच्या कडून गडकरींच कौतुक आणि काही सूचनाही , काय म्हणाले ….

हेही वाचा – “या देशात लोकशाहीचा अतिरेक…” संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐन उन्हाळी हंगामात महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी परिसरात थंडी आहे. आज तर महाबळेश्वरच्या वेण्णालेकसह लगतच्या परिसरात धुके आणि दवबिंदू पाहावयास मिळाले. अवकाळी पावसानंतर मागील आठवड्यात महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात जेट्टीसह वेण्णालेक परिसरातील वाहनांच्या टपांवर मोठ्या प्रमाणावर दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर झाल्याचे पहावयास मिळाले होते. महाबळेश्वर येथे मागील काही दिवसांपासून पारा घसरत आहे आणि कडाक्याची थंडी पडत आहे. या हवामानातील बदलावर ज्येष्ठ नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. मागील पन्नास साठ वर्षांत महाबळेश्वरमध्ये असे हवामान बदल झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.