विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विरोधक याच मुद्दयावरुन राज्य सरकारवर निशाणा साधत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना प्रत्युत्तर दिलं आहे. विनायक मेटेंच्या ड्रायवरने ओव्हटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. याबाबत फडणवीसांनी विधानसभेत निवेदनही दिले आहे.

हेही वाचा- अजित पवार म्हणाले, “विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती यांनी फोन करुन…”; फडणवीस उत्तर देताना म्हणाले, “चालकाचा…”

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
Mumtaz slams Zeenat Aman for suggesting live-in
“यामुळे फॉलोअर्स वाढणार नाही”, झीनत अमान यांच्या ‘त्या’ सल्ल्यावर भडकल्या मुमताज; म्हणाल्या, “Cool आंटी…”

वर्षा गायकवांडाचा राज्य सरकारला सवाल

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघाताची सरकारने चौकशी सुरु केली आहे. मात्र याबाबत शासन काय धोरणात्मक निर्णय घेणार आहे, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला होता.

ओव्हरटेकच्या नादात अपघात

शेवटच्या लेनमधून चालणारा ट्रॉलर मधल्या लेनमधून चालत होता. त्यामुळे विनायक मेटेंच्या ड्रायवरला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती. काही काळ ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ड्रायव्हर तिसऱ्या लेनमध्ये गेला. तिसऱ्या लेनमधूनही ओव्हरटेक करण्याच्या त्याने प्रयत्न केला मात्र, पुढे एक वाहन होते. या दोन वाहनांच्यामध्ये जी जागा होती त्या जागेतून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न मेटेंच्या ड्रायव्हरने केला. आणि त्या नादात विनायक मेटे आणि त्यांचे अंगरक्षक गाडीत ज्या बाजूला बसले होते त्या बाजूला जोरात धडक बसली असल्याचे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- “आधी अजित पवारांची माफी, मग उपमुख्यमंत्री पदावरून फडणवीसांवर निशाणा” धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी!

विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलणार

विनायक मेटे यांच्या चालकाने ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली. याबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र, गंभीर बाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही, असं म्हटलं गेलं. चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई आणि रायगड पोलीस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. पण अपघाताचे नेमके लोकेशन कळाले नसल्यामुळे उशीर झाला. त्यामुळे यंत्रणा बदलणं गरजेचं असल्याचे फडणवीस म्हणाले.

अपघाताचं लोकेशन मिळेल अशी यंत्रणा तयार करणार

अपघात झाल्यानंतर अपघाताचं थेट लोकेशन मिळणे सोपे होईल अशी यंत्रणा उभी करण्यावर भर देणार असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच लेन सोडून चालणाऱ्या गाड्यांवरही कारवाई करणार येणार असून अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करुन अशा प्रकारची यंत्रणा तयार करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.