चिपळूण आणि कामाठे स्थानकादरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
फोटो गॅलरीः मालगाडीचे १२ डबे घसरले
चिपळून नजीकच्या ओव्हार पूलाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन-तीन बोगी या रूळापासून ५० ते ६० फूट लांबपर्यत घसरत गेल्या आहेत. हा अपघात इतका मोठा आहे की रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणे अशक्य आहे. पण, रुळावरून डबे हलवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
कोकण रेल्वेच्या गाड्यांची अधिक माहिती मिळविण्यासाठी प्रवाश्यांनी ०२२-२७५८७९३९ या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रवाशांचे तिकीटाचे पैसे परत करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Oct 2014 रोजी प्रकाशित
चिपळूणजवळ मालगाडीचे १२ डबे घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प
चिपळूण आणि कामाठे स्थानकादरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

First published on: 07-10-2014 at 09:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Derailment of goods train konkan railway affected