scorecardresearch

Premium

“देसाई पुढे बोलतायत, मागे सत्तारांनी पुडीच काढली”, काँग्रेसनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणे, “उद्या तिथे…!”

महाराष्ट्र काँग्रेसने अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तारांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

abdul sattar in vidhan parishad
काँग्रेसने केली टीका

राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विधानसभा आणि विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना चितपट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही सभागृहांचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने सभागृहातील प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात कैद होते. याच कॅमेऱ्यात कैद झालेले एक दृश्य महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या ट्विटर खात्यावरून शेअर केले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय दिसतंय?

सोमवार, २४ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला. विधान परिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई निवेदन करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेत घेतल्यानंतर मोदींनी शिंदेंबाबत कौतुक करत ट्वीट केले होते. या ट्वीटची शंभूराज देसाई सभागृहाला माहिती देत होते. शंभूराज देसाई यांच्या मागेच अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार बसले आहेत. अब्दुल सत्तार एक पुडी बाहेर काढतात आणि खातात, असं काँग्रसेने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
Uddhav Thackeray Ashok Chavan
“शिवसेना, राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेस अशोक चव्हाणांना…”, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला; म्हणाले, “भाड्याच्या बेटकुळ्या…”
Champai Soren
राज्यपाल सत्तास्थापनेचं आमंत्रण देईनात? चंपई सोरेन यांनी केली आमदारांची परेड; म्हणाले, “आता फक्त…”
Mahavikas aghadi vanchit
मोठी बातमी! ‘वंचित’च्या प्रयत्नांना यश, महाविकास आघाडीत समावेश; काँग्रेस-ठाकरे गट-राष्ट्रवादीचे एकमत!

हेही वाचा >> मुंबईत आता कंत्राटी पोलीस, गृहखात्याच्या निर्णयावर रोहित पवार संतापले; म्हणाले, “नवीन प्रथा…”

महाराष्ट्र काँग्रेसने काय टीका केली?

हा व्हिडीओ शेअर करताना महाराष्ट्र काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. “विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्तार महोदयांनी थेट पुडी काढून तोंडात टाकली आणि निर्धास्तपणे चघळत बसले. आज विधानसभेत पुडी खाऊन चघळतायत, उद्या तिथे थुंकायलाही कमी करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांना विधानसभा पानाची टपरी वाटते का?”, असं ट्वीट काँग्रेसने केलं आहे.

काँग्रेसच्या या ट्वीटवर नेटिझन्सच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. “या सत्तारसाहेबांना आमदार कोणी केलंय हाच प्रश्न मला पडलाय, विधानसभेत तळमळीने मतदारसंघातले प्रश्न मांडण्याऐवजी तुम्ही गुटखा खात बसलात, पुढच्या वेळी जनता तुम्हाला कायमचं घरी बसवेल. तेव्हा चुना, गुटखा वाटल्यास मद्यपान या सर्व गोष्टीचा आस्वाद घरी बसून घ्यावा याच शुभेच्छा साहेब”, असं एका युजरने म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Desai is speaking ahead sattar is behind congress shared the video say tomorrow there sgk

First published on: 25-07-2023 at 14:41 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×