Devendra Fadnavis on Sudhir Mungantiwar Chandrapur BJP Event : निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव टाकून अपमान केल्याची खंत बाळगून माजी मंत्री तसेच चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित माजी मुख्यमंत्री दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार होते. सुधीर मुनंगटीवारांच्या अनुपस्थितीतच हा कार्यक्रम काही वेळापूर्वी पार पडला. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत सुधीर मुनगंटीवार यांचं नाव शेवटी टाकून अपमान केल्याची खंत बाळगून मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षाचं कामच असतं टीका करायचं, ते करत राहतात. स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी मला फोन केला होता, वैयक्तिक कारणामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरमधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शहरात जोगरेवार यांनी ठिकठिकाणी मोठ-मोठे फलक लावले होते. संपूर्ण चंद्रपूर शहरात भाजपाचे झेंडे व जोरगेवार यांचे फलक झळकत होते. मात्र, जोरगेवार यांनी शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मंत्री तथा चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव शेवटी टाकून अपमान केल्याची खंत बाळगून मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा >> “जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, दादासाहेबांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. अशा मोठ्या माणसाचा समाजाला विसर पडू नये म्हणून मी या कार्यक्रमाला आलो आहे. चंद्रपूर हा वाघ आणि ‘वारां’चा जिल्हा आहे. मुनगंटीवार आमचे नेते आहेत. आम्ही प्रत्येक ‘वारां’चा सन्मान करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत. मी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोललो. ते म्हणाले, त्यांना काल जोरगेवारांचा यांचा कॉल आला होता. मात्र काही वैयक्तिक कारणासाठी मुंबईत असल्याने आज या कार्यक्रमाला पोहोचणं त्यांना शक्य होणार नाही.