विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठा दावा केला होता. आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असं ते म्हणाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “अजित पवारांकडे १४५ आमदार असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. सारखं मी मुख्यमंत्री बनतो, असं म्हणायची काहीही गरज नाही. राज्यातल्या इतर विषयांकडे आपण सर्वांनी अधिक लक्ष द्यायला हवं. दरम्यान, काल (२१ एप्रिल) जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, अजित पवार बहुमताच्या बाजुने आले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात.

हे ही वाचा >> “तानाजी सावंतांना शिक्षणमंत्री करणार होतो, पण…”, ठाणे रुग्णालयाच्या भूमिपूजनावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवरांच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फडणवीस म्हणाले की, मी त्यांची (अजित पवार) मुलाखत काही पाहिली नाही. पण कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडू शकतं. त्यात वावगं असं काही नाही. अनेकांना ही गोष्ट आवडते पण सगळ्यांना मुख्यमंत्री होता येतंच असं काही नाही. अजित पवारांना आमच्या शुभेच्छा!