मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातामुळे त्यांना दुखापत झालेली आहे. रुग्णालयात असल्यामुळे त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणे शक्य होत नाही. मात्र विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे पुन्हा एकदा राजकारणाच्या मैदानात आले आहेत. त्यांनी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम वसंतराव काळे यांच्या प्रचारासाठी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केले आहे. त्यांच्या या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे भाषणादरम्यान त्यांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला आहे. या निवडणुकीमध्ये विक्रम काळे यांचाच विजय होईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ते शिक्षक परळी वैजनाथ येथील प्राध्यापक मेळाव्यास संबोधित करत होते.

हेही वाचा >>> ‘लोक परिवर्तनासाठी उत्सुक,’ म्हणणाऱ्या शरद पवारांना गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तत्वज्ञान सांगण्यापेक्षा…”

मतदार विक्रम काळे यांनाच मत देतात

“भारतीय जनता पार्टीला तसेच इतर उमेदवारांच्या सात पिढ्यांनाही विक्रम काळे कसे जिंकणार हे समजणार नाही. विक्रम काळे यांना तीन वेळा निवडणून दिलेले आहे. चौथ्या वेळेसही ते निवडून येतील. कोण कोण आणि कोठून कसे मतदान करते हे फक्त मतदारांनाच माहिती असते. संस्थाचालकांनाच माहिती असते. आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. मतदार विक्रम काळे यांनाच मत देतात, हा माझा अनुभव आहे,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

हेही वाचा >>> ‘पंडित नेहरूंवर युरोप, इंग्रजांचा प्रभाव’; गोपीचंद पडळकरांचे विधान; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत म्हणाले…

मौत कल आती है, आज आ जाए डरता कोन है

“राह मे खतरे कितने भी हो लेकीन डरता कौन है. मौत कल आती है, आज आ जाए डरता कोन है. तेरे लष्कर के मुकाबले मै अकेला हूँ, फैसला मैदान मे होता है, मरता कौन है,” असेदेखील मुंडे शायराना अंदाजात म्हणाले.

हेही वाचा >>> MIMची महाविकास आघाडीला युतीसाठी खुली ऑफर; इम्तियाज जलील म्हणाले, “ओवैसी साहेबांसोबत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रचाराचासाठीचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच उमेदवार पूर्ण ताकदीने प्रचार करताना दिसले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे मैदानात उतरले होते. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. याच कारणामुळे मुंडे यांच्या या भाषणाची चर्चा होत आहे.