अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आज भाजपा आमदार नितेश राणेंनी या प्रकरणाबद्दल बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख केलाय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधताना नितेश राणेंनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा उल्ले्ख करताना राज ठाकरेंसंदर्भातील एका प्रकरणाचाही संदर्भ दिलाय.

महापौरांना टोला…
“एका पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊतांनी महापौर किशोरी पेडणेकरांना ठणकावून सांगितलं की यापुढे दिशा सालियन प्रकरणावर बोलू नका. पण महापौर काही तिथे थांबल्या नाहीत. त्यांना राज्य महिला आयोगाला पत्रही लिहिलं. त्याचबरोबर त्या काल जाऊन त्या दिशा सालियनच्या कुटुंबियांना भेटल्याही,” असं म्हणत नितेश राणेंनी मुंबईच्या महापौरांवर टीका केलीय.

नक्की वाचा >> दिशा सालियन प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे? विचारणाऱ्या नितेश राणेंना रुपाली चाकणकरांचं उत्तर, म्हणाल्या…

आदित्य ठाकरेंवर टीका…
पुढे बोलताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंचासंदर्भ देत टीका केलीय. “याच महापौरांनी काही महिन्यांअगोदर त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात याची घोषणाही करुन टाकली. आता महापौरताईंचा हा सगळा उत्साह कदाचित अदित्य ठाकरेंनी त्यांच्या पक्षात केलेल्या ४५ वर्षांवरील लोकांना तिकीट मिळणार नाही या छुप्या घोषणेमुळे तर नाही ना?, या दिशा सालियन प्रकरणामध्ये राजकारण हे शिवसेनेच्या अंतर्गत सत्ता संघर्षामुळेच आहे,” असा टोला नितेश राणेंनी लगावलाय.

नक्की वाचा >> नवाब मलिक ईडी चौकशी : २०२४ चा इशारा देणाऱ्या राऊतांना नितेश राणेंचा टोला; म्हणाले, “यापुढे तुम्ही आपली…”

राज ठाकरेंचा उल्लेख…
ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बोलताना नितेश राणेंनी शेवटी उपहासात्मकरित्या महापौरांचे आभार मानलेत. “आपल्याला आठवत असेल की रमेश किणीचं प्रकरणातील बातम्या माननीय राज ठाकरेंची शिवसेनेमधील घोडदौड थांबवण्यासाठी बाहेर काढण्यात आल्या. तसच अदित्य ठाकरेंच्या युवासेनेला थांबवण्यासाठी हे होताना दिसतंय. असो स्वार्थासाठी का असेना महापौरताईंनी आमच्या या लढ्याला पाठिंबा दिला. दिशा सालियन न्याय मिळून देण्यासाठी पुढाकार घेतला यासाठी त्यांचे आभार,” असं नितेश राणे म्हणालेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिल्यानंतर आयोगाने मालवणी पोलिसांना दिशा सालियन प्रकरणामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.